🕒 1 min read
आयपीएल 2025 मध्ये क्वालिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवत थेट अंतिम फेरीत धडक मारली. 102 धावांचं लक्ष्य केवळ 2 विकेट्स गमावून पार करत आरसीबीने धमाकेदार कामगिरी केली. पंजाबसाठी अजून एक संधी असून ते क्वालिफायर 2 मध्ये पुन्हा मैदानात उतरतील.
या दरम्यान, एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स GT vs MI यांच्यात निर्णायक टक्कर पाहायला मिळणार आहे. हा सामना आज शुक्रवार, 30 मे रोजी होणार आहे. या लढतीत विजय मिळवणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये पंजाबशी भिडणार आहे, तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
GT vs MI: A do-or-die battle in the Eliminator; Mumbai or Gujarat, who will win?
मुंबई इंडियन्ससाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण याआधीच्या दोन्ही साखळी सामन्यांमध्ये त्यांना गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील मुंबई संघासाठी ही परतफेडीची उत्तम संधी आहे. दुसरीकडे, शुबमन गिलच्या गुजरात टायटन्सपुढे विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याचं लक्ष्य असणार आहे.
आतापर्यंतच्या 7 सामन्यांमध्ये गुजरातने 5 वेळा मुंबईला पराभूत केलं आहे. त्यामुळे आकडेवारी गुजरातच्या बाजूने आहे. मात्र, प्लेऑफमधील दडपण आणि निर्णायक क्षण कोण सांभाळतो, यावर अंतिम निकाल अवलंबून असणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- वारीसाठी मोठी घोषणा! वारकऱ्यांना टोलमाफी, विमा संरक्षण, आरोग्य सुविधा आणि नोडल अधिकारी
- मनोज जरांगे उपोषणाला बसले, तर OBC रस्त्यावर उतरणार! – लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा
- वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न? वकिलावरच केस फाईल करायला हवी – हेमंत ढोमेंचा संताप!












