Share

एसटी बसेस होणार ‘स्मार्ट’, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज

Maharashtra ST buses to become smarter with AI cameras, GPS, Wi-Fi, and fire safety systems for safer and on-time travel.

Published On: 

Maharashtra ST buses to become smarter with AI cameras, GPS, Wi-Fi, and fire safety systems for safer and on-time travel.

पुणे – महाराष्ट्रातील एसटी प्रवास आणखी सुरक्षित आणि वेळेवर करण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट बससेवेचा आराखडा तयार केला आहे. यासाठी नव्याने ३ हजार स्मार्ट बस खरेदी करण्यात आल्या असून, त्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या नव्या बसांमध्ये AI आधारित कॅमेरे, GPS ट्रॅकिंग, Wi-Fi, एलईडी टीव्ही, बस लॉकिंग सिस्टम, चालक ब्रेथ अ‍ॅनालायझर, चोरी प्रतिबंधक यंत्रणा, आणि फोम-बेस आग प्रतिबंधक प्रणाली बसवली जाणार आहे. या सर्व सुविधांमुळे प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

Maharashtra ST Smart Buses with AI, GPS, Wi-Fi

स्वारगेट बसस्थानकावरील घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर झाला असून, नवीन बसमध्ये CCTV कॅमेरे आणि चालकावर लक्ष ठेवणारे ‘थर्ड आय’ देखील बसवले जातील. याशिवाय, बस थांब्यावर उभ्या असताना पूर्णपणे लॉक ठेवण्याची व्यवस्था देखील बसमध्ये असेल.

जाहिरात महसूल वाढवण्यासाठी बसच्या आतील आणि बाहेरील भागात एलईडी पॅनल लावले जातील. यावरून सरकारचे संदेश, महत्त्वाच्या घडामोडी आणि जाहिराती दाखवल्या जातील. यामुळे प्रवासी प्रवास करत असतानाही अपडेट राहतील.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही