Share

“रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर तो…”; सुप्रिया सुळेंच्या उपोषणावर Ajit Pawar यांचा अप्रत्यक्ष टोला 

“This road is only 600 meters long and if there is a desire to build a road, it can be done with MP funds,” Ajit Pawar has commented on Supriya Sule’s hunger strike.

Published On: 

Ajit Pawar's reaction to Supriya Sule hunger strike

Ajit Pawar | पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून उपोषण सुरू केले आहे. बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाची मागणी त्यांनी केली आहे.

Ajit Pawar Reaction On Supriya Sule Hunger Strike 

सध्या ऊन वाढत चाललं आहे. जोपर्यंत कामाचे वर्क ऑर्डर निघत नाही, काहीतरी धोरणामात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे.मी अन्न खाणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) भर उन्हात आंदोलन करण्यासाठी बसल्या. यावर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. पिंपरीमध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कारासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

“पुण्यामधल्या रस्त्यासाठी उपोषणाला बसलेल्या सुप्रिया सुळे स्टंटबाजी करतात का?”, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी ‘नो कॉमेंट्स’ म्हणत उत्तर देणं टाळलं. “हा रस्ता अवघा 600 मीटरचा आहे आणि रस्ता व्हावा ही इच्छाच असेल तर तो खासदार निधीतून करता येऊ शकतो”, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install