Share

“दिशावर सामूहिक बलात्कार, Aditya Thackeray यांच्यावर गुन्हा…,” सतीश सालियान यांची खळबळजनक मागणी

Satish Salian has filed a petition in the Bombay High Court in the case of Disha Salian’s death, targeting Aditya Thackeray.

by MHD

Published On: 

Satish Salian targets Aditya Thackeray in Disha Salian death case

Aditya Thackeray । दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याची मॅनेजर राहिलेली दिशा सालियन मृत्यू प्रकरण (Disha Salian death case) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तिचे वडिल सतीश सालियन (Satish Salian) यांनी याप्रकरणी वकील अभिषेक मिश्रा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

यामुळे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणीत भर पडली आहे. कारण सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह सूरज पांचोली, डिनो मारियो आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

“दिशा ही तिच्या करिअरसाठी खूप गंभीर असल्याने ती आत्महत्या करणारच नाही. तिचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासलं. पण तिच्यावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केली आहे,” असा दावा सतीश सालियान यांनी केला आहे.

या घटनेनंतर आदित्य ठाकरे हे वरीष्ठ पोलीस अधिका-यांसोबत फोनवरून संपर्कात होते. दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी बऱ्याच वेळा फोन केले. तिच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांतसिंह राजपूत याचा देखील मृत्यू झाला.

Satish Salian on Aditya Thackeray

याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी रिया चक्रवर्तीसोबत तब्बल 44 वेळा फोनवर बोलणं केले, असा धक्कादायक आरोप याचिकेद्वारे केला आहे. त्यामुळे आता पाच वर्षांपासून दबलेल्या प्रकरणामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत, असे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही