Share

“बाण आणि घड्याळाला मतं फडणवीसांकडे बघून…”; Suresh Dhas यांचा खळबळजनक दावा

Suresh Dhas has made a sensational statement regarding the assembly elections. Due to this, it is predicted that there will be a dispute in the Grand Alliance.

by MHD

Published On: 

Suresh Dhas statement on Ajit Pawar and Eknath Shinde

Suresh Dhas । मागील काही दिवसांपासून भाजपचे आमदार सुरेश धस हे चांगलेच चर्चेत आले आहेत. महादेव मुंडे (Mahadev Munde) आणि संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणामध्ये त्यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करत असताना त्यांनी अचानक मुंडेंची भेट घेतली.

त्यामुळे त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. अशातच आता त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. “विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या चेहऱ्यावर भाजपच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या, सोबत घड्याळ आणि बाणालाही लोकांनी मत दिलं. नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मत दिली असती का?”, असा सवाल धस यांनी उपस्थित केला.

“बाणाची आणि आमची जुनी दोस्ती. पण एकनाथ शिंदे यांचा बाणही लोकांनी निवडून दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात कार्यकर्ते सांभाळणारा नेता जर कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत,” असेही धस यावेळी म्हणाले.

“विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बाण आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घड्याळाला देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी निवडून दिले आहे,” असा दावा आता सुरेश धस यांनी केला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Ajit Pawar and Eknath Shinde got votes because of Devendra Fadnavis

सुरेश धस यांच्या विधानसभा निवडणुकीबाबतच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे. यामुळे महायुतीमध्ये वातावरण तापू शकते. यावर आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही