Share

“राज्याला मिळणार तिसरा उपमुख्यमंत्री, तो शिंदे गटाचा.. “; Sanjay Raut यांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut has made an indicative statement while talking about the ongoing controversy over the guardian minister post in the state. This has created a lot of excitement.

by MHD

Published On: 

Sanjay Raut commnet on new deputy cm Maharashtra eknath shinde

Sanjay Raut । राज्यात लवकरच सत्ता बदल होणार? अशा भविष्यवाण्या अजूनही राजकीय वर्तुळात केल्या जात आहेत. सध्या अशीच काहीशी भविष्यवाणी राजकीय वर्तुळातून करण्यात आली आहे, यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून अमित शाह (Amit Shah) यांनी समांतर शिवसेना (Shivsena) तयार केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं प्रकरण फार गांभीर्याने घेऊ नये. कारण त्यांनी स्वत:च्या पालकमंत्रिपदाचा वाद सोडवावा. काल ते मुख्यमंत्री होते आज ते उपमुख्यमंत्री आहेत. उद्या ते ही राहणार नाहीत. कारण लवकरच महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळत असून तो शिंदे गटातील आहे,” असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, सध्या राज्यामध्ये पालकमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना संजय राऊत यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. परंतु, शिंदे गटाचा होणारा नवीन उपमुख्यमंत्री कोण? अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Sanjay Raut on Eknath Shinde

जर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले तर राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येऊ शकतो. तसेच एकनाथ शिंदे यांना यामुळे मोठा धक्का देखील बसू शकतो आणि त्यांना सत्तेतून बाहेर देखील पडावे लागू शकते, असे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही