वाल्मिक कराड सरकारचा जावई आहे का?; विजय वडेट्टीवार यांचा परखड सवाल

Walmik Karad ला पकडून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. त्याचा अनेक झालेल्या घटनांमध्ये सहभाग आहे का? ते बघितलं पाहिजे. खंडणीखोर, हफ्तेखोर, कायदा-सुव्यवस्था तुडवणारा हा सरकारचा जावई आहे का? कुणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे? – Vijay Wadettiwar

Published On: 

Vijay Wadettiwar | "वाल्मिक कराड सरकारचा जावई आहे का?"; विजय वडेट्टीवार यांचा परखड सवाल

Vijay Wadettiwar | संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश सुरु आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. खंडणी मारामारी आणि देशमुख यांच्या निर्घृण हत्येमध्येही सर्वाधिक आरोप होत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुण्यामध्ये CID पथकाने ताब्यात घेतले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन सरकारवर निशाणा साधला आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधाराला सोडणार नाही. त्यांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली होती. आता काय झालं?”,असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सवाल उपस्थित केला आहे.

“वाल्मिक कराडला पकडून त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे. त्याचा अनेक झालेल्या घटनांमध्ये सहभाग आहे का? ते बघितलं पाहिजे. खंडणीखोर, हफ्तेखोर, कायदा-सुव्यवस्था तुडवणारा हा सरकारचा जावई आहे का? कुणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे?”, अशा शब्दात त्यांनी सरकारवर आगपाखड केली आहे.

पुढे ते म्हणाले, “पोस्को सारख्या घटना झाल्या. खुनाचे प्रकरण दाबली गेली. आरोपी मोकाट आहे. आकाच्यावर बाका आहे, तो सुद्धा राजकीय राजाश्रय असल्याशिवाय न्यायाची अपेक्षा करू शकणार नाही. सरकारची इतकी बदनामी होत असताना शांतपणे बसले आहेत.” त्याचबरोबर त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

“मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं माझं मत आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे हे एकच आहेत. व्यवहार एकत्र, जमिनी, बिझनेस एकच, घट्ट मैत्रीचे सबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला केल्याशिवाय न्याय मिळणार नाही”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही