Share

अरविंद केजरीवालांना सुप्रीम कोर्टाचा दणका; जामिनावरील पुढील सुनावणी २६ जूनला

🕒 1 min read Supreme Court ।  दिल्ली दारू घोटाळ्यात मनी लाँड्रींग प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना दिल्लीतील ट्रायल कोर्टानं जामीनही मंजूर केला होता, मात्र दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांच्या जामिनावर अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानंही (Supreme Court) अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का दिला. जामीन … Read more

Published On: 

🕒 1 min read

Supreme Court ।  दिल्ली दारू घोटाळ्यात मनी लाँड्रींग प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना दिल्लीतील ट्रायल कोर्टानं जामीनही मंजूर केला होता, मात्र दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांच्या जामिनावर अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयानंही (Supreme Court) अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का दिला.

जामीन स्थगितीविरोधात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कोणताच निर्णय झाला नसल्याने केजरीवाल यांना तुरुंगातच राहावं लागणार आहे. आज न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि एस.वी. भट्टी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती हटवण्यास नकार दिला. जोपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत अरविंद केजरीवाल यांना जामीन देता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. म्हणजेच केजरीवाल यांच्या याचिकेवर २६ जून रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, दिल्लीतील मद्य विक्री घोटाळ्याप्रकरणी ईडीने २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. त्यानंतर १० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही