🕒 1 min read
Sharad Pawar VS Election Commission: लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेच्या निवडणुका डोळ्या पुढे ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार ॲक्शन मोडवर (Sharad Pawar In Action mode) आले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. तर अपक्ष उमेदवारांना ‘पिपाणी’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्याने शरद पवारांच्या पक्षाला फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुक आयोगाला (Election Commission) पत्र लिहण्यात आलं आहे . या पत्रात त्यांनी लोकसभेला घोळ झाला तसा विधानसभेला नको असं म्हणत फ्री सिम्बॉलमधून पिपाणी चिन्ह वगळण्याची विनंती केली आहे. यामध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा समावेश असल्यामुळे अडचणी येत असल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. तसेच याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सातारा लोकसभेसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी या चिन्हामुळे निवडणुकीत फटका बसला होता . यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही प्रतिक्रिया दिली होती.
सातारा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. येथून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली होती. ते सहज निवडून येतील अशी अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. या मतदारसंघात पिपाणी या चिन्हामुळं फटका बसला. साताऱ्यात शशिकांत शिंदे ३२ हजार मतांनी पराभूत झाले. तर, पिपाणी या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराला ३७ हजार मतं मिळाली, पिपाणी आणि तुतारी यात मतदारांचा गोंधळ झाला, असं जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे.
आगामी विधानसभेची जबाबदारी शरद पवार यांनी निवडून आलेल्या खासदारांसह वरिष्ठ नेत्यांकडे सोपवली आहे. राजेश टोपे, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्राची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता लोकसभेनंतर विधानसभेतही शरद पवार गट गुलाल उधळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .
महत्वाच्या बातम्या
- संजोग वाघेरेंविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार, गाडीवर ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह लावणं भोवणार
- पत्रकारांस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल
- अहमदनगर मतदारसंघात सुजय विखे कुटुंबाकडून पैशांचा पाऊस; निलेश लंकेंचे गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











