🕒 1 min read
Shrirang Barne पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते एकवटले असून ठिकठिकाणी संयुक्त बैठका घेऊन प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे.
खासदार बारणे यांच्या प्रचारार्थ भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे व राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर योगेश बहल यांच्या पुढाकाराने संत तुकारामनगर येथे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मतदानाची टक्केवारी वाढवून बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
बैठकीस आमदार उमा खापरे, माजी महापौर योगेश बहल, भाजप नेते सदाशिव खाडे, अमित गोरखे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे, माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे, माजी नगरसेवक वसंत शेवडे, नारायण बहिरवाडे, बबनराव गाडवे, जितेंद्र ननावरे, निलेश बारणे तसेच नंदू कदम, माणिकराव अहिरराव, फजल शेख, मायला खत्री, विशाल काळभोर, राहुल खाडे, सतीश नागरगोजे, मंगेश धाडगे, वर्षा जगताप, सुनील पालांडे, राजेश वाबळे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घरोघरी प्रचार करणार…
आतापर्यंत झालेल्या प्रचाराचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. संत तुकाराम नगर परिसरामध्ये प्रत्येक घरापर्यंत उमेदवाराचे परिचय पत्रक पोहोचवण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घरोघर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महायुतीच्या वतीने एक मोठी प्रचार फेरी संत तुकाराम नगर भागामध्ये काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरले.
आमदार खापरे, योगेश बहल, सदाशिव खाडे आदी नेत्यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अशाच प्रकारच्या महायुतीच्या संयुक्त बैठका शहराच्या विविध भागांमध्ये घेऊन समन्वयाने अधिक प्रभावी पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे, अशी माहिती खाडे यांनी दिली.
मराठा महासंघाचा पाठिंबा…
अखिल भारतीय मराठा महासंघ, खान्देश तिळवण तली समाज मंडळ, माजी सैनिक संस्था अशा विविध संस्था संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने खासदार बारणे यांना पाठिंब्याचे लेखी पत्र देण्यात आले. पत्रावर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष संतोष भांगरे, सरचिटणीस संजय देसाई यांच्या सह्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- वाघेरे कुटुंबीयच श्रीरंग बारणेंना प्रचंड मताने विजयी करणार; तरुण नेत्याचा गौप्यस्फोट
- सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमधील नवक्रांतीसाठी इलेव्हेट एज आणि मॅक्झिमाईज मार्केट रिसर्च एकत्र
- शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळरावांना विरोध वाढला; धक्कादायक निकालाची नोंद होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











