शिंदे-फडणवीसांना जोरदार झटका; महायुतीच्या मोठ्या नेत्याचा काँग्रेसला पाठिंबा

Bacchu Kadu | महाविकास आघाडीनंतर महायुतीमध्ये खटके उडायला सुरवात झाली आहे. महायुतीत कल्याण, अमरावती, रायगड, नाशिक, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर येथे जागा वाटपावरून वाद सुरु आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी या पूर्वीच विरोध दर्शवला होता. अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून … Read more

Published On: 

Bacchu Kadu | महाविकास आघाडीनंतर महायुतीमध्ये खटके उडायला सुरवात झाली आहे. महायुतीत कल्याण, अमरावती, रायगड, नाशिक, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर येथे जागा वाटपावरून वाद सुरु आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी या पूर्वीच विरोध दर्शवला होता. अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर अनेक ठिकाणी जागावाटपावर महायुतीत ठिणगी पडायला सुरवात झाली आहे.

दरम्यान महायुतीविरोधात बच्चू कडू हे आक्रमक झाल्याचे चित्र सद्या राज्यात पाहायला मिळत आहे. अमरावती नंतर रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचे समोर आले आहे.

नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये उमेदवारी दिल्यावरुन बच्चू कडू नाराज आहेत. महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणांसाठी मत मागणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. त्यानंतर आता रामटेक लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू यांनी काँग्रेसला समर्थन जाहीर केले. म्हणजे बच्चू कडू महायुतीविरोधात काम करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.

महायुतीमध्ये बच्चू कडू यांचा सन्मान होत नाही त्यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.  प्रहार पक्षाने लोकसभेसाठी एक जागा मागितली होती आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता, तरीही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. यामुळे बच्चू कडू आंक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही