🕒 1 min read
Jasprit Bumrah | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आहे. त्यामुळे आयपीएल हंगाम संपल्यानंतर क्रिकेट चाहते आतुरतेने पुढच्या आयपीएल हंगामाची वाट बघत असतात.
अशात आयपीएल 2024 ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आयपीएलच्या येत्या हंगामामध्ये आपल्याला अनेक संघात मोठे बदल झालेले दिसणार आहे.
यापैकी एक मोठा बदल आपल्याला मुंबई इंडियन्समध्ये ( Mumbai Indians ) झालेला दिसणार आहे. कारण मुंबई इंडियन्सचा जुना खेळाडू पुन्हा संघात परतला आहे.
हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya ) गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) ची साथ सोडलेली असून तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे.
हार्दिकच्या एंट्रीनंतर मुंबई इंडियन्समध्ये घडामोडींनी वेग धरला आहे. हार्दिकच्या एंट्रीनंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे.
Hardik Pandya has joined Mumbai Indians
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्या गुजरातच्या जर्सीत न दिसता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या जर्सीत दिसणार आहे. हार्दिक पांड्या मुंबईमध्ये पुन्हा सामील झाल्यानंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अशात बुमराने ( Jasprit Bumrah ) त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे. “कधी कधी शांत राहणे, हेच सर्वोत्तम उत्तर असते”, अशी स्टोरी त्याने इंस्टाग्रामवर टाकली आहे.
त्याचबरोबर त्याने ( Jasprit Bumrah ) मुंबई इंडियन्सला अनफॉलो देखील केलं आहे. या सर्व घडामोडीनंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल, अशा चर्चा सुरू होत्या. परंतु, हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबईत सामील झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिककडे सोपवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर जसप्रीत बुमराह नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- Job Interview | नोकरीची मुलाखत देताना काय करायचं? जाणून घ्या सोप्या टिप्स
- Raj Thackeray | हिंदुत्वाबद्दल शिंदे सरकार फक्त तोंड वाजवतंय – राज ठाकरे
- Eknath Shinde | मराठा आरक्षणाबाबत जी छगन भुजबळांची भूमिका, तीच सरकारची भूमिका – एकनाथ शिंदे
- Rohit Pawar | ‘महाराष्ट्र धर्म‘ संपवण्याचे काम आधुनिक ‘अनाजी पंत‘ करताय; रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
- Govt Job Opportunity | सीमा शुल्क आयुक्तालयात सरकारी नोकरीची संधी! आजपासूनच करा अर्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











