Share

Uddhav Thackeray | मिंधे सरकार दुष्काळाची जुमलेबाजी करतंय; ठाकरे गटाचा हल्लाबोल

🕒 1 min readUddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. नव्याने काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचे ‘लॉलीपॉप’ राज्य सरकारने दाखविले आहे. मात्र ते तालुके आणि विभाग कोणते याचा तपशील अद्यापि … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

नव्याने काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचे ‘लॉलीपॉप’ राज्य सरकारने दाखविले आहे. मात्र ते तालुके आणि विभाग कोणते याचा तपशील अद्यापि गुलदस्त्यात आहे.

मिथे सरकारने हा ‘गुलदस्ता’ सत्ताधारी आमदारांना देण्यासाठी दडवून ठेवला आहे का? विकास निधीपासून विकास कामांपर्यंत हे सरकार राजकारणच करीत आहे. दुष्काळासारखा जीवनमरणाचा विषय तरी त्यातून वगळा!

चांदवड तालुक्यात तीन दिवसांत दुष्काळात होरपळणाऱ्या दोन शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले. त्याची तरी चाड बाळगा. मात्र ते सोडून मिंधे सरकार दुष्काळाचीही जुमलेबाजी करीत आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

राज्यातील आणखी काही तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यात 40 तालुके सरकारने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते.

त्यात आता आणखी काही तालुक्यांची भर पडणार आहे. अर्थात, हे तालुके कोणते आणि त्यांची संख्या किती, हे अद्यापि जाहीर झालेले नाही राज्य सरकारने नवीन दुष्काळग्रस्त गावांचे पिल्लू सोडले खरे, परंतु त्याचा तपशील जाहीर न करण्याची हातचलाखी केलीच 40 तालुके दुष्काळी म्हणून घोषित केले त्यावेळीही सरकारचा दृष्टिकोन हाच होता.

अर्थात, त्यातही नेहमीचे घाणेरडे राजकारण सत्ताधाऱ्यांनी केलेच होते. 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे कसे? असा सवालच विरोधी पक्षांनी केला होता. दुष्काळ हा दुष्काळ असतो.

मग तो ओला दुष्काळ असो की, कोरडा दुष्काळ तो राज्यकर्ता पक्ष आणि विरोधी पक्ष, गरीब श्रीमंत, बागायती जिरायती असा भेद करीत नाही. त्यामुळे त्याबाबतीत तरी सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थाचा विचार न करता निरपेक्ष निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असते.

मात्र राज्यात सध्याचे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्येक गोष्टीत फक्त आणि फक्त राजकारणच केले जात आहे आमदारांना निधी वाटण्यापासून त्यांच्या मतदारसंघामधील समस्यांपर्यंत सत्ताधारी पक्षांनाच झुकते माप दिले जात आहे.

निदान दुष्काळाबाबत तरी निरपेक्ष राहा. यंदा राज्यातील बयाच भागात भीषण दुष्काळाचे सावट आहे, हे वास्तव आहे. तरीही 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करायला विरोधी पक्षांना सरकारला दे माय धरणी ठाय करून सोडावे लागले.

त्यातही सत्ताधारी आमदारांचीच काळजी घेतली गेली. मिथे सरकारची नियत ही अशी आहे. वास्तविक ऐन पावसाळ्यात अनेक गावांमध्ये टँकरने पिण्याचे पाणी पुरविण्याची वेळ आली हाच राज्यात मोठ्या भागांत दुष्काळ असल्याचा पुरावा आहे.

तरीही मिधे सरकारची झापडे बंदच होती. विरोधी पक्षानी टीकेची झोड उठविल्यानंतर सरकारने 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले तेदेखील उपकार केल्याच्या आविर्भावात दुष्काळाचेही राजकारण करण्यात आपण मागे नाही, हेच त्यातून सरकारने दाखवून दिले.

आताही सरकार तेच करणार आहे का? अन्यथा नवीन दुष्काळी तालुके आणि त्यांचे विभाग याचाही तपशील जाहीर करतानाच दिला गेला असता. 40 दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करताना सरकारने सत्ताधारी विरोधक असा दुजाभाव केला.

दशकानुदशके ज्यांच्या पाचवीला दुष्काळ पुजला आहे, अशा तालुक्यांचाही समावेश त्या यादीत नव्हता आता नव्याने काही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचे ‘लॉलीपॉप’ राज्य सरकारने दाखविले आहे.

मात्र ते तालुके आणि विभाग कोणते याचा तपशील अद्यापि गुलदस्त्यात आहे गिधे सरकारने हा ‘गुलदस्ता’ सत्ताधारी आमदारांना देण्यासाठी दडवून ठेवला आहे का? विकास निधीपासून विकास कामांपर्यंत हे सरकार राजकारणच करीत आहे.

दुष्काळासारखा जीवनमरणाचा विषय तरी त्यातून वगळा! दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकयांच्या वाढत्या आत्महत्यांची कदर करा चादवड तालुक्यात तीन दिवसात दुष्काळात होरपळणाऱया दोन शेतकरयांनी मृत्यूला जवळ केले.

त्याची तरी चाड बाळगा. मात्र ते सोडून मिथे सरकार दुष्काळाचीही जुमलेबाजी करीत आहे. वरून दुष्काळग्रस्तांना दिलासा देत असल्याचा आव आणीत आहे. हा दिलासा नसून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

सौजन्य – सामना

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!