🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून आरक्षणासाठी झटत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या महिन्यात जालना जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं होतं.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीवरून जरांगे यांनी 40 दिवसांसाठी उपोषण थांबवलं होतं. परंतु, 40 दिवसानंतर राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही.
यादरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी मराठ्यांच्या मागणीला विरोध केला. यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील समावेश आहे.
यावरून मराठा क्रांती मोर्चाने राधाकृष्ण विखे पाटील यांना धारेवर धरलं आहे. स्वतःची ओबीसीतून सोय करणारे राधाकृष्ण विखे पाटलांचा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.
Maratha Kranti morcha commented on Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध केला आहे. यावरून मराठा क्रांती मोर्चाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुणबी असल्याचा दावा करत स्वतःची सोय करून ठेवली आहे. परंतु, ते आता मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत असल्याचा मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं आहे.
“मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागणे चुकीचे, असे म्हणणाऱ्या विखे पाटील यांच्याकडे ओबीसी दाखला! गरीब मराठा समाजाच्या मतावर मोठे झालेले, पण गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे.
यासाठी तोंडातून ब्र शब्द न काढणारे सर्वपक्षीय नवसरंजामदार मराठा नेते हे खरे गरीब मराठा आरक्षणाचे शत्रू आहेत, त्यांनी मात्र स्वतः ओबीसीतून सोय करून ठेवली आहे, त्याचे एक उदाहरण म्हणजे मंत्री माननीय ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा “कुणबी” दाखला सोबत जोडला आहे.
असे सर्वपक्षीय बहुतेक मराठा नेत्यांनी “कुणबी” असल्याचे दाखले काढून ठेवले आहेत, परंतु गरीब मराठा समाज मरत असतांना, त्यांना आरक्षण मिळावे, म्हणून प्रयत्न करण्याऐवजी “मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण मागणी करू नये,” म्हणून त्यांनाच शहाणपणा शिकवत आहेत.
गृहीत धरून गरीब मराठ्यांवर राज्य करणाऱ्या नेत्यांच्या जोखडातून मुक्त झाल्याशिवाय गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही”, असं मराठा क्रांती मोर्चाने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं; आरक्षणासाठी शिंदे गटातील नेत्यांने दिला राजीनामा
- Maratha Reservation | PM मोदी आज शिर्डी दौऱ्यावर; मराठा समाज अडवणार मोदींचा ताफा?
- Manoj Jarange | मराठ्यांनी त्या श्रद्धेयांना खूप मोठं केलंय; मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांचे कान टोचले
- Uddhav Thackeray | हसन मुश्रीफांनी भाजपचे वस्त्रहरण केलेय; ठाकरे गटाची टीका
- Weather Update | ऑक्टोबर हिटपासून मिळणार दिलासा; थंडीची चाहूल लागण्याचा हवामान खात्याने दिला अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











