Sanjay Raut | नाशिक: राज्यामध्ये सध्या ड्रग्स प्रकरण चर्चेत आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला मुंबई पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली आहे.
त्यानंतर त्यांना मोठं वक्तव्य केलं आहे. मी पळून गेलो नव्हतो, मला पळवलं होतं असं त्यानं म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांची मती थोडी गुंग झाली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Don’t pay too much attention to Devendra Fadnavis – Sanjay Raut
आज (20 ऑक्टोबर) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “लवकरच मोठं नेक्सेस उघड होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका.
ते सध्या भरकटलेल्या सारखे बोलत आहेत. कारण मोठं नेक्सेस उघड झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस भांग पीत नसतील, परंतु त्याच्या वासाने त्यांना नशा येत असेल. देवेंद्र फडणवीस यांची मती थोडी गुंग झालेली आहे.
राज्यामध्ये एक पिढी बरबाद होताना दिसत आहे आणि गृहमंत्री त्याचं राजकारण करत आहे. गृहमंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर एका पोलिसांवर हल्ला झाला.
देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहे, हे आपलं मोठं दुर्दैव आहे. महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री पाहिले आहे.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळली आहे. मात्र, फडणवीस त्यांच्या बाजूला बसलेल्या गुंड, मवाली, माफिया यांची बाजू घेतात.”
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, ” गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधकांबद्दल सगळी माहिती असते. मात्र त्यांच्याकडे माफिया लोकांची माहिती नाही.
काही घटना घडली तर विरोधकांना त्याचं जबाबदार ठरवायचं. परंतु, आम्हाला हा महाराष्ट्र वाचवायचा आहे. या महाराष्ट्रातील मराठी मुलांचं आम्हाला संरक्षण करायचं आहे.
फडणवीस सध्या त्यांच्या आजूबाजूला असलेल्या ड्रग्स माफियांना वाचवणाऱ्या आमदारांची बाजू घेत आहे. ते सध्या खोटी प्रकरण निर्माण करून विरोधकांना बदनाम करत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | महाराष्ट्रात सरकार आहे की नाही? ठाकरे गटाचा खोचक सवाल
- Weather Update | राज्यावर ‘तेज’ चक्रीवादळाचं संकट, पाहा कधी धडकणार वादळ
- Eknath Shinde | राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय
- Maratha Reservation | आधी मराठा आरक्षण आणि मग इलेक्शन; आत्महत्या करणाऱ्या तरुणाची सुसाईड नोट आली समोर
- Govt Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











