IND vs BAN | भारत-बांगलादेश सामन्यावर ओढवणार ‘तेज’ चक्रीवादळाचं सावट? पाहा हवामान अंदाज

IND vs BAN | पुणे: आज (19 ऑक्टोबर) आयसीसी एकदिवसी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि बांगलादेश दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दुपारी 02 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र, सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण काल (18 ऑक्टोबर) संध्याकाळी पुणे शहरामध्ये पावसाने हजेरी लावली. तर … Read more

Published On: 

IND vs BAN | पुणे: आज (19 ऑक्टोबर) आयसीसी एकदिवसी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि बांगलादेश दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दुपारी 02 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र, सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो.

कारण काल (18 ऑक्टोबर) संध्याकाळी पुणे शहरामध्ये पावसाने हजेरी लावली. तर दुसरीकडे अरबी समुद्रामध्ये तेज नावाचं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज देखील पुण्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाने अत्यंत चांगली सुरुवात केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये शानदार विजय नोंदवला आहे.

यानंतर गुणतालिकेत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर भारतीय संघ आपल्या चौथ्या सामन्यासाठी सुसज्ज झाला आहे.

One to four percent chance of rain during IND vs BAN match

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान एक ते चार टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या सामन्यादरम्यान शहरातील तापमान 33 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे.

पुणे शहरामध्ये बुधवारी संध्याकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे आज देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी हा सामना बघायला जाताना आवश्यक ती तयारी करूनच सामना बघायला जावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, बांगलादेविरुद्ध (IND vs BAN) होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सुसज्ज झाला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल, हार्दिक पांड्या, ईशान किशन, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज इत्यादी खेळाडूंचा समावेश असेल.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही