Chandrashekhar Bawankule | मोदींना विरोध करायला उद्धव ठाकरे कुठेही जाऊ शकतात – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: आज (23 जुन) पाटणा शहरामध्ये विरोधी पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीला देशासह राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील या बैठकीला उपस्थित आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मोदींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे … Read more

Published On: 

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: आज (23 जुन) पाटणा शहरामध्ये विरोधी पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीला देशासह राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील या बैठकीला उपस्थित आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मोदींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे कुठेही जाऊ शकतात, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Uddhav Thackeray has abandoned ideology – Chandrashekhar Bawankule

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचारांपुढे आत्मसर्पण केलं आहे. उद्धव ठाकरे काहीही करू शकतात. त्यांनी सगळी विचारधारा सोडून दिली आहे . त्यामुळे ते पाटणाला आणि अजून कुठेही जाऊ शकतात.”

पुढे बोलताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे कुठेही जातील. कारण त्यांनी विचारधारा सोडून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात काही करायचं असेल तर उद्धव ठाकरे त्या रांगेत पहिल्या क्रमांकावर उभे असतील.”

दरम्यान, आज होणाऱ्या या विरोधी पक्षाच्या बैठकीमुळे सत्ताधारी (Chandrashekhar Bawankule) आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. त्याचबरोबर या बैठकीत नक्की काय चर्चा होणार? याचा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही