Share

Praful Patel | पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं स्वप्न पूर्ण झालचं पाहिजे – प्रफुल्ल पटेल

Praful Patel | मुंबई: मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं  स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. We have to work hard in 2024 elections … Read more

Published On: 

Praful Patel | मुंबई: मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलत असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पवार साहेबांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवायचं  स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

We have to work hard in 2024 elections – Praful Patel 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलत असताना प्रफुल्ल पटेल (Praful Patel ) म्हणाले, “2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनं कंबर कसून काम केलं पाहिजे. कारण आपल्याला पवार साहेबांना (Sharad Pawar) पंतप्रधान खुर्चीवर बसवायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे.” प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Release me from the post of Leader of Opposition – Ajit Pawar

या कार्यक्रमामध्ये बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले, “आमदारांच्या आग्रहामुळे मी विरोधी पक्षनेते पद स्वीकारलं होतं. मला आता विरोधी पक्षनेते पद नको. मला या जबाबदारीतून मुक्त करा.”

“मला विरोधी पक्षनेतेपदातून मुक्त करून संघटनेची जबाबदारी द्या. त्यानंतर मी पक्ष कशा पद्धतीने चालवतो ते बघा. मी फक्त माझी इच्छा बोलून दाखवली आहे. बाकी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार नेतेमंडळींना आहे”, असही ते (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install