Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात आज विरोधी पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीचं आयोजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केलं आहे. त्याचबरोबर या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आदी नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीवर केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीवर केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जे मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाहीत ते उध्दव ठाकरे आज पाटणा जात आहे, असं केशव उपाध्ये यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Keshav Upadhye’s tweet on opposition party meeting
बिनपैशाची मनोरंजन आज पाटण्यात पहायला मिळेल
जे मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाहीत ते उध्दव ठाकरे आज पाटणा जात आहेत.
जे नितीश कुमार भाजपाच्या जीवावर मुख्यमंत्री झाले ते भाजपा विरोधकांची बैठक बोलवत आहेत.
हिंदुत्वाच्या विरोधातील ममता बॅनर्जी यांच्या जोडीला आदित्य ठाकरे बसणार
कोरोना काळात स्वतासाठी राजमहल उभा करणारे केजरीवाल त्यागाचा गोष्टी सांगणार
बिनपैशाची मनोरंजन आज पाटण्यात पहायला मिळेल
जे मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाहीत ते उध्दव ठाकरे आज पाटणा जात आहेत
जे नितीश कुमार भाजपाच्या जीवावर मुख्यमंत्री झाले ते भाजपा विरोधकांची बैठक बोलवत आहेत.
हिंदुत्वाच्या विरोधातील ममता बॅनर्जी यांच्या जोडीला आदित्य ठाकरे…
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 23, 2023
Opponents come together to protect their own interests – Chandrashekhar Bawankule
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील ट्विट करत या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “एकीकडे पंतप्रधान जी अमेरिकेत जाऊन देशाची मान उंचावत आहेत तर दुसरीकडे मोदीजींच्या विरोधात गळा काढण्यासाठी विरोधक आज पाटण्यात एकत्र येत आहेत. मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र आलेत.”
“एकत्र आलेल्या विरोधकांना जनतेची नाही तर आपल्या मुलांची चिंता आहे. सोनिया गांधी राहुल गांधींना पंतप्रधान करु इच्छितात, शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंचं भविष्य दिसतंय. त्यामुळे आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठी विरोधक एकवटले आहेत. पण देशातील जनता या विरोधकांचा डाव ओळखून आहे. २०१९ सालीही जनतेनं मोदीजींवर विश्वास टाकत फक्त आपल्या कुटुंबाचं हित बघणाऱ्या विरोधकांना घरी बसवलं होतं आता २०२४ मध्येही जनता मोदीजींची साथ देणार आहे,” असही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेच्या ‘या’ फीचरमुळे KYC करणं झालं सोपं
- Ambadas Danve | देशावर प्रेम करणारे सर्व पक्ष आज एकत्र; विरोधी पक्षाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
- Chandrashekhar Bawankule | मोदीजींना देशहिताची चिंता आहे तर विरोधक स्वतःच हित जपण्यासाठी एकत्र – चंद्रशेखर बावनकुळे
- Sharad Pawar | विरोधी पक्षांच्या बैठकीला निघताना शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
- Devendra Fadnavis | “तुम्हाला मातोश्रीवरून वरळीला जाता आलं नाही अन् तुम्ही…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला