IND vs WI | WTC फायनलनंतर टीम इंडिया ‘या’ तारखेला जाणार वेस्टइंडीज दौऱ्यावर

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळला जात आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर दुपारी 03 वाजता या सामन्याला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप संपल्यानंतर भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकबझने या दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. India … Read more

Published On: 

IND vs WI | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळला जात आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर दुपारी 03 वाजता या सामन्याला सुरुवात झाली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप संपल्यानंतर भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकबझने या दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

India will tour the West Indies from July 12 to August 13

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, भारत 12 जुलै पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत वेस्टइंडीज (IND vs WI) दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये होणारे सामने जिओ सिनेमावर क्रिकेट चाहत्यांना मोफत बघता येणार आहेत. त्याचबरोबर हे सामने डीडी स्पोर्ट्सवर देखील तुम्ही बघू शकतात.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये होणारी मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी साधारण एक महिना विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. क्रिकबझने भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यामध्ये सुरू होणाऱ्या मालिकेच्या तारखेचा अंदाज बांधला आहे.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलनंतर जिओ सिनेमाने हजारो सबस्क्रायबर गमावले असल्याचं, इनसाईट स्पोर्ट्स या पोर्टलच्या एका वृत्तामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यामध्ये होणारी मालिका तुम्हाला जिओ सिनेमावर मोफत बघता येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही