Sanjay Raut | “संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी दिली आहे”; राधाकृष्ण विखे पाटीलांचं टीकास्त्र

Sanjay Raut | नाशिक: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी कर्नाटक निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर … Read more

Published On: 

Sanjay Raut | नाशिक: राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी कर्नाटक निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांच्यावर टीका करत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेपेक्षा जास्त बोलू नये. संजय राऊत यांच्यावर काय बोलायचं? त्याचबरोबर भडोत्री माणसावर काय बोलणार.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय राऊत यांची भविष्यवाणी कधीच खरी ठरली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. भविष्यामध्ये त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल? काय माहित? काही दिवसांनी संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसेल, अशा शब्दांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. स्थानिक राज्याचे निवडणुकांचे विषय वेगवेगळे असतात. त्याची तुलना केंद्रासोबत करू नये.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही