Sharad Pawar | कमिटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sharad Pawar Update | मुंबई : आज (5 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP)निवड समितीची बैठक पार पडली. या निवड समितीमधील नेते उपस्थित होते. तर बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत. NCP चे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल ( Praful Patel) यांनी माध्यमांशी संवाद साधत कमिटीच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला याबाबत माहिती दिली. काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ( … Read more

Published On: 

Sharad Pawar Update | मुंबई : आज (5 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP)निवड समितीची बैठक पार पडली. या निवड समितीमधील नेते उपस्थित होते. तर बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत. NCP चे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल ( Praful Patel) यांनी माध्यमांशी संवाद साधत कमिटीच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला याबाबत माहिती दिली.

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल ( What did Praful Patel say)

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत संवाद साधला त्यावेळी पटेल म्हणाले की, देशाला, राज्याला आणि पक्षाला शरद पवार साहेबांची गरज आहे. यामुळे निवड समिती शरद पवारांनी दिलेला राजीनाम एकमताने नामंजूर करत आहोत. तसचं त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती आम्ही या निवेदनात केली आहे. हा निर्णय आम्ही त्यांना कळवणार आहोत. याचप्रमाणे शरद पवार साहेबांचा वेळ घेऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहोत.

दरम्यान, पुढे प्रफुल्ल पटेल म्हणाले की, जेव्हा त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी आमच्यापैकी एकालाही याबाबत कल्पना दिली नाही यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा माघारी घ्यावा अशी विनंती देखील केली होती. परंतु त्यांनी त्याचवेळी समितीची स्थापना करून येत्या काही दिवसात याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं होतं. या समितीची जबाबदारी माझ्यावर दिली असल्याने आम्ही आज बैठक घेऊन एकमताने हा ठराव केला आहे.असं देखील प्रफुल्ल पटेल. यामुळे आता पुढे समितीच्या निवेदनानंतर शरद पवार कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही