Share

Bitter Gourd | सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

🕒 1 min read Bitter Gourd | टीम महाराष्ट्र देशा: कारले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारल्यामध्ये अँटिइफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, ते शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. कारल्याप्रमाणेच कारल्याचा ज्यूस देखील आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. कारल्याच्या रसामध्ये फायबर, प्रोटीन, झिंक, फोलेट, विटामिन सी इत्यादी पोषक तत्त्व आढळून येतात. त्यामुळे कारल्याच्या रसाचे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bitter Gourd | टीम महाराष्ट्र देशा: कारले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारल्यामध्ये अँटिइफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, ते शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. कारल्याप्रमाणेच कारल्याचा ज्यूस देखील आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. कारल्याच्या रसामध्ये फायबर, प्रोटीन, झिंक, फोलेट, विटामिन सी इत्यादी पोषक तत्त्व आढळून येतात. त्यामुळे कारल्याच्या रसाचे सकाळी रिकामी पोटी सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा ज्यूस प्यायल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Bitter Gourd Benefits)

कारल्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. कारल्याच्या रसाचे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने तुम्ही सर्दी, खोकला इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर नियमित या रसाचे सेवन केल्याने मेंदू निरोगी राहू शकतो.

डायबिटीससाठी फायदेशीर (Beneficial for diabetes-Bitter Gourd Benefits)

तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल, तर सकाळी रिकाम्या पोटी कारल्याच्या रसाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारल्याचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. कारल्याच्या रसामध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म आढळून येतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Beneficial for diabetes-Bitter Gourd Benefits)

तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर सकाळी रिकाम्या पोटी कारल्याच्या रसाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारल्याच्या रसामध्ये आढळणारे घटक भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर कारल्याच्या रसामध्ये  कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आढळून येते. त्यामुळे हा रस वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

कारल्याचा रस प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर रोजच्या आहारात जिऱ्याचा समावेश केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पोट निरोगी राहते (Stomach remains healthy-Cumin Seeds Benefits)

नियमित जिऱ्याचे सेवन केल्याने पोट निरोगी राहू शकते. जिरे खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस, एसिडिटी इत्यादी समस्या कायमच्या दूर होऊ शकतात. जिऱ्याचा आहारात समावेश केल्याने पचनशक्ती देखील मजबूत होऊ शकते.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Cumin Seeds Benefits)

तुम्ही जर वजन कमी करायचा विचार करत असाल, तर जिरे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्हाला तीन ग्राम जिरे पावडरमध्ये आवश्यकतेनुसार दही मिसळून घ्यावे लागेल. या मिश्रणाचे तुम्हाला दररोज सेवन करावे लागेल. नियमित याचे सेवन केल्याने तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही