Share

Potato Facepack | चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी वापरा बटाट्याचे ‘हे’ फेसपॅक

🕒 1 min read Potato Facepack | टीम महाराष्ट्र देशा: बटाटा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जाते. त्याचबरोबर बटाटा आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. बटाट्यामध्ये विटामिन सी, मॅग्नेशियम, फॉलेट, अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. बटाटा त्वचेवरील घाण साफ करतो आणि डागही दूर करतो. त्याचबरोबर त्वचेचा रंग सुधारण्यासाठी बटाट्याचा फेसपॅक उपयुक्त … Read more

Published On: 

🕒 1 min read

Potato Facepack | टीम महाराष्ट्र देशा: बटाटा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जाते. त्याचबरोबर बटाटा आपल्या त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतो. बटाट्यामध्ये विटामिन सी, मॅग्नेशियम, फॉलेट, अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जातात. बटाटा त्वचेवरील घाण साफ करतो आणि डागही दूर करतो. त्याचबरोबर त्वचेचा रंग सुधारण्यासाठी बटाट्याचा फेसपॅक उपयुक्त ठरू शकतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने बटाट्याचा वापर करू शकतात.

मध आणि बटाटा (Honey and Potato Facepack-For Skin Care)

बटाटा आणि मध दोन्ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बटाटा चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत करतो. तर मध त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्यास मदत करतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला दोन चमचे बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर साधारण पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवरील अतिरिक्त घाण निघून जाऊ शकते.

टोमॅटो आणि बटाटा (Tomato and Potato Facepack-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी बटाटा आणि टोमॅटो उपयुक्त ठरू शकतो. कारण या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे त्वचेवरील डाग साफ करण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला एक चमचा बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा टोमॅटोचा रस मिसळून घ्यावा लागेल. तयार झालेले हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकतात.

मुलतानी माती आणि बटाटा (Multani Mati and Potato Facepack-For Skin Care)

चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी बटाटा आणि मुलतानी माती फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एका भांड्यात दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा बटाट्याचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते.

त्वचेचा रंग सुधारण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती पद्धती वापरू शकतात.

कोरफड (Aloevera-For Skin Irritation)

चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. कोरफडीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील जळजळ कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर थेट चेहऱ्यावर लावावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोरफडीच्या गरामध्ये काही थेंब गुलाब जल मिसळू शकतात. कोरफडीच्या मदतीने तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.

कडुलिंब (Neem-For Skin Irritation)

त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. कडुलिंबामध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, जे जळजळ आणि खाज कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पाण्याने अंघोळ देखील करू शकतात. या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवरील बहुतांश समस्या सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही