Weather Update | पुढचे तीन दिवस महत्त्वाचे, राज्यात पावसासह गारपीटीची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पावसाने (Heavy rain) हजेरी लावली आहे, तर कुठे उन्हाचा तडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यामध्ये बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस कोसळला आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे.

आज (17 मार्च) राज्यातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार, जळगाव या भागांमध्ये पावसाच्या सरी बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

‘या’ भागांत ऑरेंज अलर्ट (Orange alert in ‘these’ areas)

विदर्भातील बहुतांश ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी (Weather Update) केला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील वातावरणात सातत्याने बदल (Weather Update) होताना दिसत आहे. कुठे ढगाळ वातावरण आहे, तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा फटका शेतीतील पिकांना बसत आहे. या वातावरणाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचा संकट घोंगावत आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.