Share

Devendra Fadnavis | मुंबईत ‘अजित पवार भावी मुख्यमंत्री’ पोस्टर्स झळकले; फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis | मुंबई : राज्यात सरकार कोसळण्याच्या चर्चेला चांगलाच जोर आला आहे. सरकार कोसळण्याच्या जोरदार चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील (Jayant Patil) हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागले होते आणि आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर अजित पवार (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे … Read more

Published On: 

Devendra Fadnavis | मुंबई : राज्यात सरकार कोसळण्याच्या चर्चेला चांगलाच जोर आला आहे. सरकार कोसळण्याच्या जोरदार चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील (Jayant Patil) हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागले होते आणि आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर अजित पवार (Ajit Pawar) भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर्स झळकताना पहायला मिळत आहेत.

मुंबईत लावलेल्या या पोस्टर्सच्या मुद्द्यावरुन बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या पोस्टर्सवरुन खोचक टोला लगावला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.

Devendra Fadnavis Comment on Ajit Pawar

“भावी म्हटलंय ना.. कधीतरी त्यांचं राज्य येईल.. येऊ शकतं कधीतरी ते येऊ शकतं”, अशी देवेंद्र प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. ‘बॅनरवर भावी म्हटलंय ना.. कधी तरी जेव्हा त्यांचं राज्य येईल.. येऊ शकतं कधीतरी येऊ शकतं. येईल तेव्हा ठरवतील कोण मुख्यमंत्री हे… त्याची लढाई आतापासूनच का?’ असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, एकच दादा, एकच वादा, अजित दादा’, अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आल्याचे पहायला मिळालं आहे. त्यावरुन फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कोण होऊ शकतं, यावरून चर्चा सुरु आहे. यात अजित पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या तीन नावांची चर्चा आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचा पुढचा मुख्यमंत्री महिला असू शकतो, असं वक्तव्य केल्यानंतर सुप्रिया सुळेंचं नाव चर्चेत होते. त्यानंतर आता अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही