Radhakrishna Vikhe Patil | “सुधीर तांबेंमधील काँग्रेसचे रक्त…”; विखे पाटलांचा मिश्किल टोला

Radhakrishna Vikhe Patil | नाशिक : नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला तरी कार्यकर्ते मात्र, सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार प्रचार करताना दिसले. त्यामुळे आगामी काळात लवकरच सत्यजित तांबेंना अधिकृत पाठिंबा मिळेल असे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Published On: 

Radhakrishna Vikhe Patil | नाशिक : नाशिक विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपचा अधिकृत पाठिंबा जाहीर झाला नसला तरी कार्यकर्ते मात्र, सत्यजित तांबेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार प्रचार करताना दिसले. त्यामुळे आगामी काळात लवकरच सत्यजित तांबेंना अधिकृत पाठिंबा मिळेल असे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असून अन्य उमेदवारांची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी गावातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयात पदवीधर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते बोलत होते.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले,” मी जी माहीती घेतोय त्यात कार्यकर्त्यांची जी भूमिका आहे, त्यानुसार, लोकांमध्ये सत्यजित तांबेंना मतदान करण्याबाबत चर्चा सुरू आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतला असून तो स्थानिक पातळीवरील निर्णय आहे.

आम्ही अजूनही काँग्रेसचे असून आमच्या रक्तात काँग्रेस असल्याचे सुधीर तांबे म्हणालेत. त्यांच्या वक्तव्यावर विखे पाटील म्हणाले, “सुधीर तांबे (Sudhir Tambe) तीनदा काँग्रेस पक्षाकडून निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्तात काँग्रेस थोडीशी तरी असणारच. काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागेल.”

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही