गोकुळ पाठोपाठ वारणा दूध संघाकडूनही मोठी दरवाढ; ग्राहकांना मोठा दणका

गोकुळ पाठोपाठ आता वारणा दूध संघानेही म्हशीच्या आणि गायीच्या दूध दरात मोठी वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे.

Published On: 

Warna Milk price hike news in Marathi

कोल्हापूर, 21 नोव्हेंबर: गोकुळ दूध संघाने केलेल्या ऐतिहासिक दरवाढीनंतर आता वारणा दूध संघानेही ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. वारणाने म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर ६ रुपयांची वाढ केली असून, हे नवे दर आजपासूनच लागू होणार आहेत.

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर म्हशीच्या दुधामागे ६ रुपयांची दरवाढ केली होती. गोकुळच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी दरवाढ ठरली. त्यावेळी खरेदी दरातही ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. गोकुळचे दूध महागल्यामुळे अनेक ग्राहकांनी स्वस्त मिळणाऱ्या वारणा दुधाच्या खरेदीवर भर दिला होता.

मात्र, आता वारणा संघानेही गोकुळप्रमाणेच दरवाढ लागू करून ग्राहकांची निराशा केली आहे. वारणाने म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात ६ रुपयांची तर खरेदी दरात ३ रुपयांची वाढ केली आहे. याशिवाय गायीच्या दुधाच्या विक्री दरात ४ रुपयांची आणि खरेदी दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

या नव्या दरवाढीमुळे कोल्हापूर परिसरात गोकुळ आणि वारणा या दोन्ही डेअरीच्या म्हशीच्या दुधाची विक्री आता ७८ रुपये प्रति लिटर दराने होणार आहे. एकाच वेळी झालेल्या या मोठ्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट विस्कटणार असून ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही