प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाने आगामी बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी (वनडे आणि टी-२०) आपले संघ जाहीर केले आहेत. यात दुखापतीतून सावरल्यानंतर वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याने संघात पुनरागमन केले आहे. आगामी वनडे आणि टी-२० मालिकेत तो दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल.
या मालिकेतील आणखी एक मोठी घडामोड म्हणजे स्टार वेगवान गोलंदाज अॅनरिक नॉर्खियाचे वनडे संघात झालेले पुनरागमन होय. सप्टेंबर २०२३ नंतर नॉर्खिया पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. १ ते ७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी केशव महाराजकडे दक्षिण आफ्रिकेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
दुसरीकडे, १० ते १३ डिसेंबर या कालावधीत खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेची धुरा ब्योर्न फोर्टुइनकडे देण्यात आली आहे. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमधील शानदार कामगिरीच्या जोरावर यष्टीरक्षक-फलंदाज सिनेथेम्बा केशिले याला टी-२० संघात निवड करून बक्षीस देण्यात आले आहे.
वनडे संघ: केशव महाराज (कर्णधार), डेवाल्ड ब्रेव्हिस, कॉर्बिन बॉश, जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, ब्योर्न फोर्टुइन, जॉर्डन हर्मन, डुआन जॅनसेन, न्कोबानी मोकोएना, लुआन-ड्रे प्रिटोरियस, अॅनरिक नॉर्खिया, लुंगी एन्गिडी, सिनेथेम्बा केशिले आणि ट्रिस्टन स्टब्स.
टी-२० संघ: ब्योर्न फोर्टुइन (कर्णधार), डेवाल्ड ब्रेव्हिस, जेराल्ड कोएत्झी, कॉनर एस्टरहुझेन, डोनोव्हन फरेरा, जॉर्डन हर्मन, डुआन जॅनसेन, क्वेना मफाका, न्कोबानी मोकोएना, न्काबा पीटर, लुआन-ड्रे प्रिटोरियस, सिनेथेम्बा केशिले, ट्रिस्टन स्टब्स आणि प्रिनेलन सुब्रायन.








