Share

Nitesh Rane | संजय राऊतांनी बरबाद केलेल्या त्या डॉक्टर महिलेला आधी न्याय द्या; नितेश राणेंची शरद पवारांना विनंती

🕒 1 min readNitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (29 जुन) पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी 2023 ते मे 2023 या कालावधीमध्ये राज्यातून हजारो महिला गायब झाल्या असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल (29 जुन) पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जानेवारी 2023 ते मे 2023 या कालावधीमध्ये राज्यातून हजारो महिला गायब झाल्या असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्द्यावरून नितेश राणेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

The life of a woman doctor in Mumbai has been ruined by Sanjay Raut – Nitesh Rane

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “शरद पवार यांनी राज्यातील गायब झालेल्या मुलींची आकडेवारी दिली. मुंबईतील एका डॉक्टर महिलेचं आयुष्य संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळे बरबाद झालं आहे. संजय राजाराम राऊत यांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना तिचं जगणं मुश्किल केलं होतं. त्या महिलेला शरद पवारांनी न्याय मिळवून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो.”

पुढे बोलताना ते (Nitesh Rane)  म्हणाले, “संजय राऊत हे महिला अत्याचारांबाबत बोलत आहे. त्याचबरोबर महिला अत्याचारावरून संजय राऊत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत आहे. हा सर्वात मोठा जोक आहे. म्हणजे उद्या शक्ती कपूरनं महिला सुरक्षेबाबत कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर देण्यासारखा हा विषय आहे. आधी त्या डॉक्टर महिलेला न्याय द्या आणि मग राज्यातील अन्य महिलांबद्दल बोला, एवढंच मी संजय राजाराम राऊत यांना सांगेल.”

दरम्यान, शरद पवार यांनी राज्यातील महिला सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर वक्तव्य करण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष घ्यावं, असं शरद पवार म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हे ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!