Share

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ठरणार वादळी ; विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरणार

After the Lok Sabha elections, the monsoon session of the state legislature is starting from today. In this session, the opposition has made a strong effort to catch the government in a dilemma over the farmer loan waiver, reservation dispute, Pune drugs, CET scandal. Therefore, this year’s monsoon session is likely to be stormy.

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्य विधीमंडळाचं (Maharashtra Legislative Assembly Monsoon Session ) पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, आरक्षण वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी घोळ यावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे .

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली असून महायुतीला फटका बसला आहे. दरम्यान विधानसभा निवडणूक ही आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच आता आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये विविध मुद्यावरून जुंपणार आहे . आज सरकारच्या वतीने अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार असून 28 जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार आहे

या अधिवेशनात पावसामुळे खंड पडल्याने राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, शेतकऱ्यांचा प्रश्न , शेतकरीला मदत न करने – शेतकरीला पीक कर्ज न देने तसेच मराठा विरुद्ध ओबीसी वाद ,राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था अशा अनेक मुद्द्यावरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे . मात्र यावेळी सरकार आपली बाजू सावरण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत मोठ्या घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून विधानसभेसाठी आघाडीतील नेत्यांनी जोरदार कंबर कसली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!