Share

Eknath Shinde | योगाच्या माध्यमातून मोदींनी जगाला आरोग्याची गुरुकिल्ली दिली – एकनाथ शिंदे

🕒 1 min readEknath Shinde | मुंबई: आज (21 जुन) जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जात आहे. योग दिनाच्या निमित्त्यानं गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. Narendra Modi has given the key to … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई: आज (21 जुन) जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जात आहे. योग दिनाच्या निमित्त्यानं गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Narendra Modi has given the key to health through yoga – Eknath Shinde

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सुरू केली आहे. योगाच्या माध्यमातून मोदींनी जगाला आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योग ही काळाची गरज झाली आहे.”

पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “आज राज्यात अनेक ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही एक अत्यंत आनंदाची आणि कौतुकाची बाब आहे.” “योग करा निरोगी रहा”, असंही ते यावेळी म्हणाले आहे.

दरम्यान, विधान भवन परिसरात देखील योग दिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमास रमेश बैस (Ramesh Bais), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी योगासनं केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!