‘क्रिकेटने आता पुढे जायला हवे’: ‘सँडपेपरगेट’ वादावर अ‍ॅलिस्टर कूक यांची स्पष्ट प्रतिक्रिया

उस्मान ख्वाजा यांच्या आत्मचरित्रामुळे पुन्हा चर्चेत आलेल्या ‘सँडपेपरगेट’ प्रकरणावर इंग्लंडचे माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

Published On: 

"Cricket needs to move forward": Alastair Cook reacts to fresh Sandpapergate controversy

Gurugram, २८ नोव्हेंबर: ८ वर्षांपूर्वी घडलेल्या ‘सँडपेपरगेट’ प्रकरणाची चर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र, इंग्लंडचे माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कूक यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले असून, क्रिकेटने आता या वादातून पुढे जाण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.

उस्मान ख्वाजा यांच्या आत्मचरित्रामुळे २०१८ मधील या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणाला पुन्हा वाचा फुटली आहे. यावरून मायकेल वॉन आणि नासेर हुसेन यांसारख्या इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी क्रिकेट ऑस्ट्रेलियावर जोरदार टीका केली. तसेच, या प्रकरणात तत्कालीन गोलंदाज आणि सध्याचा ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यामागील सत्य उघड करण्याची मागणी त्यांनी केली होती.

मात्र, अ‍ॅलिस्टर कूक यांचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुग्राममध्ये आले असताना त्यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’शी संवाद साधला. कूक म्हणाले, “इतर देशांप्रमाणेच आमचीही प्रतिक्रिया आहे. सँडपेपरगेटबद्दल बोलण्याचा आता सर्वांनाच कंटाळा आला आहे. जे घडायचे ते घडून गेले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःची यंत्रणा आहे. यातून आणखी काही वाईट निष्पन्न व्हावे अशी माझी अजिबात इच्छा नाही.”

कूक यांनी पुढे नमूद केले की, या प्रकरणात विशेषतः ३ खेळाडूंनी (स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट) शिक्षा भोगली आहे. त्यामुळे क्रिकेटने आता यातून पुढे जायला हवे आणि भविष्यात क्रिकेटमध्ये काय चांगले होऊ शकते याकडे लक्ष द्यायला हवे.

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडू सँडपेपरचा वापर करताना रंगेहाथ पकडले गेले होते. त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केवळ स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांनाच दोषी ठरवले होते. मात्र, ख्वाजा यांनी आपल्या पुस्तकात या प्रकरणात संपूर्ण संघ सामील असल्याचा दावा केला आहे. कमिन्स आणि माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी हे दावे फेटाळून लावले असले तरी, वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांनी मात्र ख्वाजा यांना पाठिंबा दिला आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही