पुण्यात मंदार किवळेवर कोयत्याने रक्तरंजित हल्ला; वर्षभरापासून शिजत होता बदल्याचा कट

पुण्यातील शिवाजीनगर भागात शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर ६ जणांनी गोळीबार व कोयत्याने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केला.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, २५ नोव्हेंबर: पुण्यातील शिवाजीनगर भागात शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी मंदार किवळे याच्यावर एकूण ६ जणांनी गोळीबार करत आणि कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या निर्घृण हल्ल्यात मंदार रक्ताच्या थारोळ्यात पडला असून, त्याचे दोन्ही हात तुटून लटकत असल्याचे उघड झाले आहे. या थरारक घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

शुभम चव्हाण याच्या हत्येला १ वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. या हत्येचा बदला घेण्यासाठी चव्हाण याच्या साथीदारांनी साधारण वर्षभरापूर्वीपासूनच हा कट रचण्यास सुरुवात केली होती. शुभमच्या मारेकऱ्यांना संपवण्याचा डाव त्यांनी आखला होता.

या हत्या प्रकरणात आरोपी असलेला मंदार किवळे हा ४ ते ५ दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. तो बाहेर आल्याची माहिती मिळताच आरोपींनी त्याच्यावर पाळत ठेवून १ ते २ दिवसांपासून सापळा (ट्रॅप) लावला होता.

न्यायालयीन कामकाजासाठी मंदार किवळे आज शिवाजीनगर भागात जात असताना दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याला गाठून हा रक्तरंजित हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यातील आरोपींची ओळख पटली असून, त्यांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली आहेत.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही