ऊस दराचा तिढा कायम: कारखानदार ३१५० रुपयांवर ठाम, शेतकरी संघटनांचा २२ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

सोलापुरातील ऊस दरप्रश्नी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेली बैठक निष्फळ ठरली. कारखानदार ३१५० रुपयांवर ठाम असल्याने शेतकरी संघटनांनी दिला आंदोलनाचा इशारा.

Published On: 

Sugarcane farmers protest meeting in Solapur over price deadlock

सोलापूर, 19 नोव्हेंबर: सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये एकमत होऊ शकले नाही. साखर कारखानदार प्रतिटन ३ हजार १५० रुपये दरावर ठाम असून, ३ हजार ५०० रुपयांच्या मागणीवर शेतकरी संघटना अडून राहिल्यास कारखाने बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत शेतकरी संघटनांनी सुरुवातीला उसाला ३ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली. मात्र, एवढा दर देणे शक्य नसल्याचे कारखानदारांनी स्पष्ट केले. यावर मध्यस्थी करत पालकमंत्री गोरे यांनी प्रशासनाच्या वतीने पहिली उचल ३ हजार २५० रुपये आणि गाळप हंगाम संपल्यानंतर १०० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच, याबाबतचे परिपत्रक काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी कारखानदारांनी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. दुसरीकडे, शेतकरी संघटना पहिली उचल ३ हजार ३०० रुपये, गाळप संपल्यावर १०० रुपये आणि पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी आणखी १०० रुपये, असा एकूण ३ हजार ५०० रुपये दर देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

जिल्ह्यात सध्या कार्तिकी वारी असल्याने शेतकरी संघटना कारखानदारांच्या निर्णयाची दोन ते तीन दिवस वाट पाहणार आहेत. मात्र, त्यानंतरही निर्णय न घेतल्यास २२ नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत या प्रश्नावर कोणता तोडगा निघतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही