देवेंद्र फडणवीस हेच ‘मफलर मॅन’; रोहित पवारांच्या दाव्यावर भाजप नेत्यांचा जोरदार पलटवार

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवत असल्याचा आरोप रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. यावर भाजपने जोरदार टीका केली आहे.

Published On: 

BJP MLA Rajendra Raut criticizing Rohit Pawar

मुंबई, 17 नोव्हेंबर: मुंबई आणि पुण्यात गेल्या काही दिवसांपासून झळकलेल्या ‘मफलर मॅन’च्या बॅनरमागचे रहस्य आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत उलगडले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक रोहित सिंग यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, देवेंद्र फडणवीस हेच ते ‘मफलर मॅन’ असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवारांनी जयपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील देवेंद्र फडणवीस आणि रोहित सिंग यांचा एकत्र असलेला फोटो पत्रकार परिषदेत दाखवला. फडणवीसांकडूनच या कंपनीच्या मालकाला पाठीशी घातले जात असून, आपल्या या दाव्यात काही चूक वाटत असल्यास सरकारने याची सखोल चौकशी करावी, असे थेट आव्हानही त्यांनी दिले आहे.

रोहित पवारांच्या या आरोपांवरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हा केवळ एक प्रसिद्धीस्टंट असल्याचे म्हटले आहे. आज पार पडलेल्या अजित पवारांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळू नये, म्हणूनच हे नीच राजकारण करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. २०१३ पासून व्हीएसआर कंपनी आणि रोहित सिंग राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांना व सरकारला विमानसेवा पुरवत आहेत, त्यामुळे केवळ एका फोटोवरून असे गंभीर आरोप करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष या आरोपांशी सहमत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भाजपचे नेते आणि माजी मंत्री प्रवीण दरेकर यांनीही रोहित पवारांवर सडकून टीका केली. अमाप प्रसिद्धी मिळवण्यासाठी रोहित पवार शरद पवारांची राजकीय परंपरा मातीत घालत असून, त्यांना वेड्याच्या रुग्णालयात पाठवण्याची गरज असल्याचे दरेकर म्हणाले. कोणत्याही पुराव्याविना केवळ फोटोवरून आरोप करणाऱ्या रोहित पवारांनाच पोलिसांनी या घातपात प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावले पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवताना ‘डोंगर पोखरून उंदीर काढला’ असा टोला लगावला. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण प्रक्रियेत आपल्याला मंत्रिपद मिळणार नाही हे रोहित पवारांना माहीत आहे. त्यामुळे भाजपच्या प्रमुख नेत्यांवर आरोप करून किमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद पदरात पाडून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा पडळकरांनी केला. तसेच, केवळ आरोप करण्यापेक्षा पुरावे योग्य यंत्रणांकडे द्यावेत, आणि अजित पवारांच्या प्रकरणाची काळजी केवळ रोहित यांनाच नाही, तर दादांच्या कुटुंबालाही असल्याचे पडळकर यांनी सुनावले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही