हार्दिक पांड्याच्या ट्रेडनंतर मुंबई इंडियन्सचा पुढचा कॅप्टन कोण? फ्रँचायझीने दिली पहिली अधिकृत प्रतिक्रिया

हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्यातील ट्रेडनंतर मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधाराची जोरदार चर्चा रंगली असून, याबाबत फ्रँचायझीने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Published On: 

Mumbai Indians captaincy speculations and Hardik Pandya trade

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: हार्दिक पांड्याच्या पंजाब किंग्समधील ट्रेडनंतर मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार कोण होणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर आता मुंबई इंडियन्सने पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, कर्णधारपदाबाबत काळजीपूर्वक विचार करून योग्य वेळी घोषणा केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्रेड मुंबई आणि पंजाब यांच्यात नुकताच पार पडला. या डीलमध्ये मुंबईने हार्दिक पांड्याला पंजाबला दिले, तर त्याच्या बदल्यात १८ कोटी रुपये मोजून अर्शदीप सिंगला आपल्या संघात घेतले आहे. पंजाबलाही हार्दिक पांड्या १८ कोटी रुपयांनाच मिळाला आहे.

या करारानंतर हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर पंजाब किंग्सच्या जर्सीतील स्वतःचा एक फोटो शेअर केला. या फोटोला त्याने ‘माझी टीम पंजाब, माझा कोच रिकी पॉन्टिंग आणि माझा कॅप्टन श्रेयस अय्यर’, असे कॅप्शन दिले आहे. यातून त्याने पंजाबचा कर्णधार कोण असेल, हे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, हार्दिकने मुंबईची साथ सोडल्याने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांची नावे मुंबईच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. यापैकी तिलक वगळता इतर तिन्ही खेळाडूंनी यापूर्वी मुंबई संघाचे नेतृत्व केले आहे.

याआधी न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी रोहित शर्मा आणि मुंबईच्या मॅनेजमेंटमध्ये कर्णधारपदाबाबत चर्चा झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावेळी रोहितने तिलक वर्माचे नाव सुचवले होते. मात्र, तिलक भविष्यातील कर्णधारपदाच्या योजनांचा भाग असल्याचे सांगत मॅनेजमेंटने रोहितला पटवून दिले. त्यानंतर रोहितने पुन्हा एकदा नेतृत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली, असे या वृत्तात म्हटले होते.

असे असले तरी, फ्रँचायझीने अद्याप २०२७ च्या आयपीएल हंगामासाठी कर्णधारपदाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगितल्याने यावरील सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२७ चा लिलाव १६ डिसेंबर २०२६ रोजी गोव्यात होणार आहे. त्यापूर्वी १७ नोव्हेंबरला सर्व १० संघांना त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार असून, यासाठी आता केवळ सहा दिवस शिल्लक आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही