सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांवर घणाघात; मातंग, मराठा समाजाचे उमेदवार पडले, मग दुःख फक्त मुलाचेच का?

गोकुळमध्ये शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून महायुतीवर टीका करताना सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Published On: 

Give funds for the development of temples instead of Shaktipeeth highway; Satej Patil demands

कोल्हापूर, 9 नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) शासननियुक्त पाच संचालकांच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्याच्या महायुतीच्या प्रयत्नांविरोधात काढण्यात आलेल्या ‘संघर्ष मोर्चा’त सतेज पाटील (Satej Patil) यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. या दोन्ही नेत्यांच्या हट्टापायीच सहकार मोडीत काढण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुश्रीफांनी केलेल्या जातीयवादाच्या आरोपांना उत्तर देताना सतेज पाटील म्हणाले की, निकाल लागल्यापासून मुश्रीफांनी केवळ आपला मुलगा पडल्याचे चार वेळा बोलून दाखवले. पण निवडणुकीत मातंग समाजाचे सुजित मिणचेकर आणि मराठा समाजातील युवराज पाटील यांचाही पराभव झाला, यावर ते अवाक्षरही बोलले नाहीत. “मग खरे जातीयवादी कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण शाहू महाराजांच्या पायाजवळ बसणारे असून, सर्व उमेदवार कार्यकर्ते म्हणूनच उभे होते आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेली २५-३० वर्षे काँग्रेसची धुरा सांभाळूनही आपण कधीही सत्तेच्या दारात गेलो नाही, असेही ते म्हणाले.

१०० वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी कोल्हापुरात सहकाराचा कायदा आणला, पण आज त्याच सहकाराला पायदळी तुडवले जात आहे. त्यामुळे हा संघर्ष केवळ कोल्हापूरचा राहिला नसून संपूर्ण महाराष्ट्राचा झाला आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी कोरमची आवश्यकता नसल्याचे सांगत, विरोधी गटातील १२ सदस्यांनी उद्या उपस्थित राहून चेअरमनची निवड करावी, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

सहा महिन्यांपूर्वी गोकुळवर प्रशासक आणण्यासाठी सरकारने एका दिवसात कायदा केला, ज्याला सर्वोच्च न्यायालयात जाऊन रद्द करावे लागले. त्यावेळी सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले गप्प होते आणि मुश्रीफांनी अदृश्य शक्तीचे नाव घेण्याचे धाडस दाखवले नाही, असा टोला त्यांनी लगावला. जिल्ह्यातील १० आमदार, २ खासदार आणि मंत्र्यांची फौज विरोधात असतानाही लोकांनी आपल्याला कौल दिला. आपण साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी लढत होतो, तर मुश्रीफ केवळ आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी लढत होते. १५ वर्षे सोबत सत्तेत राहूनही गोकुळचे दार न उघडलेल्या मुश्रीफांना ‘बंटी पाटलांच्या’ हातानेच प्रवेश मिळाला, याची आठवणही त्यांनी करून दिली.

हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच गोकुळमध्ये संचालक नेमण्याचा निर्णय झाला असून, समोरच्या बाजूने कुणीही प्रामाणिक न राहता केवळ ‘सिंगल’ मते मागितल्याचा आरोप पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी सरकारकडून नेमण्यात येणाऱ्या चार स्वीकृत तज्ज्ञ संचालकांची नावे फोडली. यामध्ये शिवाजी आडनाईक (पन्हाळा), स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीणचंद्र हेंद्रे, कृष्णात पाटील (कागल) आणि अॅड. प्रशांत पाटोळे (सांगली) यांचा समावेश आहे. कोल्हापुरातील सतरंज्या उचलणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याचे नाव त्यांना सुचले नाही, मात्र सांगलीचा माणूस गोकुळवर लादला जात आहे. मुश्रीफ किंवा इतरांच्या माणसांना संधी मिळाली नसून या चौघांच्या किती म्हशी आहेत हे कुणालाच माहीत नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली.

सांगलीतील तज्ज्ञ संचालकाच्या नियुक्तीतून गोकुळला ‘अमूल’च्या दावणीला बांधण्याची सुरुवात होत असून, गोकुळ संघ ‘सरदार पटेल फेडरेशन’मध्ये विलीन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. देशात फक्त अमूल आणि मदर डेअरी याच दोन संस्था ठेवण्याचे हे षड्यंत्र आहे. गोकुळ हा कोल्हापूरच्याच मालकीचा राहिला पाहिजे. हा नवा कायदा केवळ गोकुळपुरता मर्यादित राहणार नसून भविष्यात ग्रामपंचायती आणि हाऊसिंग सोसायट्यांनाही लावला जाईल, असा दावा सतेज पाटील यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही