या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत

ऑडिओ क्लिप आणि ५०० कोटींच्या व्यवहारावरून संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा. या राजकीय नाट्यात फडणवीस, शिंदे आणि जरांगे हीच मुख्य पात्रे असल्याचा दावा.

Published On: 

Sanjay Raut on Mumbai Mayor post

प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिप आणि ५०० कोटी रुपयांच्या आरोपांवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. या संपूर्ण नाट्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे ही तीनच महत्त्वाची आणि मुख्य पात्रे असून, बाकी सगळे केवळ ‘एक्स्ट्रा’ कलाकार असल्याची बोचरी टीका राऊत यांनी केली.

५०० कोटी रुपयांच्या व्यवहाराची चर्चा थेट भाजपची कोअर टीम करत असल्याचा दावा राऊत यांनी केला. ५०० कोटी ही लहान रक्कम नाही, मग या व्यवहाराबाबत मुख्यमंत्र्यांना आधी गुन्हा दाखल करावा आणि नंतर एसआयटी स्थापन करावी, असे का वाटले नाही? असा सवाल त्यांनी विचारला. अयोध्या प्रकरणात आधी गुन्हा दाखल झाला आणि मग एसआयटी स्थापन झाली होती. मात्र, इथल्या एसआयटीतून मुख्य आरोपींनाच वगळण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आतापर्यंतच्या एसआयटीचे कोणते अहवाल आले? असा प्रश्न विचारत, ही एसआयटी म्हणजे केवळ धूळफेक आणि नाटक असल्याचे ते म्हणाले.

ही ५०० कोटींच्या देण्याघेण्याची चर्चा पूर्णपणे भाजपची अंतर्गत बाब असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यांच्या माहितीनुसार, हे कृत्य भाजपच्याच एका विधान परिषद आमदाराने केले आहे. ‘तुम्ही त्याचे फार लाड केले, तेच आता अंगलट आले आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. पैसे मला दिले की नाही, याबाबतची टेप कोणी फोडली? असा सवाल करत मुख्यमंत्री नेमके कोणाला वाचवत आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. एकमेकांना अडचणीत आणण्यासाठीच या सर्व गोष्टींचा वापर होत असून, या प्रकरणाची कधीच नीट चौकशी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजपचे अंतर्गत संभाषण रेकॉर्ड होत असेल, तर गृहखातेच तुमच्या विरोधात गेल्याचे स्पष्ट होते. पूर्वी आमचे फोन टॅप केले जायचे, आता तुमचेच लोक तुमचे फोन टॅप करत आहेत. स्वतःला ‘छोटे चाणक्य’ समजणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की, आता जनताच खरी चाणक्य आहे, असे राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी ठरल्याचा घणाघात त्यांनी केला. याचबरोबर, आता केंद्रातील सरकार पडणार याची खात्री पटत असल्याचेही संजय राऊत यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

संजय राऊत यांच्या मते, या संपूर्ण नाट्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे ही तीनच मुख्य पात्रे असून बाकी सगळे केवळ 'एक्स्ट्रा' कलाकार आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही