एकनाथ शिंदेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार, म्हणाल्या ‘हे तर अकलेचे दिवाळे’

५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून शिंदेंच्या अटकेची मागणी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांवर ज्योती वाघमारेंनी पलटवार करत त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Published On: 

Jyoti Waghmare slams Harshvardhan Sapkal over Eknath Shinde arrest demand

प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या क्लिपवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना अटक करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. त्यांच्या या मागणीवर शिवसेना (शिंदे गट) नेत्या आणि खासदार ज्योती वाघमारे यांनी जोरदार पलटवार केला असून, ही मागणी म्हणजे सपकाळांच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे लक्षण असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या कथित क्लिपमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जरांगे यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले. तसेच हे पैसे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत देण्यात आल्याचेही या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. ही क्लिप समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी थेट ट्विट करत म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी. ऑडिओमध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांना तात्काळ अटक करावी. तसेच, हे ५०० कोटी रुपये कुठून आले, कोणी आणले आणि कोणाला दिले, याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी आक्रमक मागणी सपकाळ यांनी केली.

सपकाळ यांच्या या टीकेला खासदार ज्योती वाघमारे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे अकलेचे स्पष्ट दिवाळे निघाल्याचे लक्षण असून, त्यांची ही मागणी ऐकून त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे वाघमारे म्हणाल्या. ऑडिओ क्लिपच्या आधारावर अटक करा म्हणणे हा बालिशपणा आहे. जरांगे यांनी ऐकवलेल्या क्लिपमध्ये एक तिसरीच अज्ञात व्यक्ती श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल केवळ अफवा पसरवत आहे. त्यामुळे कोणताही पुरावा नसताना फक्त एका कथित ऑडिओ क्लिपच्या आधारे अटकेची मागणी करणारे सपकाळ यांचे डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवालही वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

कथित ऑडिओ क्लिपनुसार, जरांगे यांना देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि हे पैसे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत देण्यात आले, असा दावा करण्यात आला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही