प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांचे पुरावे म्हणून कथित ऑडिओ क्लिप्स समोर आणल्या आहेत. या क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख असून, जरांगे यांना कसे बदनाम करायचे आणि ५०० कोटींच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असल्याचे ऐकायला मिळते.
या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. राहुल शेवाळे, मिलिंद देवरा आणि सचिन अहीर यांच्यासह खासदार, आमदार व मंत्र्यांचे हे शिष्टमंडळ फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले आहे. जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केलेल्या या कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी व्हावी, अशा मागणीचे निवेदन या शिष्टमंडळाकडून दिले जाणार आहे.
दरम्यान, या क्लिपमधील आवाज भाजप नेत्यांचे असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र, भाजपने हे दावे फेटाळले असून, आपला या ऑडिओ क्लिपशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आजकालच्या ‘एआय’च्या जमान्यात हे आवाज कृत्रिमरीत्या तयार केलेले असू शकतात, अशी शक्यताही काही भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे.
शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. आता या कथित ऑडिओ क्लिपच्या तपासणीचे आदेश दिल्यानंतरच त्यातील आवाज नेमका कोणाचा आहे, हे स्पष्ट होणार असून पुढील काही दिवसांत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी; अर्शदीप सिंगची खास क्लबमध्ये एन्ट्री
- न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये अभिषेक शर्माकडून सोपा झेल सुटला, चाहते म्हणाले ‘हा तर दुसरा बाबर आझम’
- भुवनेश्वर कुमारचं निराशाजनक पुनरागमन; ४ वर्षांपूर्वीच्या शेवटच्या टी-२० सामन्यापेक्षाही खराब कामगिरी
Quick Answers
या ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख असून, मनोज जरांगे यांना कसे बदनाम करायचे आणि ५०० कोटींच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असल्याचे ऐकायला मिळते.
मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी व्हावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी हे शिष्टमंडळ गेले आहे.
या शिष्टमंडळात राहुल शेवाळे, मिलिंद देवरा आणि सचिन अहीर यांच्यासह खासदार, आमदार व मंत्र्यांचा समावेश आहे.
क्लिपमधील आवाज भाजप नेत्यांचे असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे, तर भाजपने हे दावे फेटाळून आपला याच्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच 'एआय'च्या माध्यमातून हे आवाज कृत्रिमरीत्या तयार केलेले असू शकतात, अशी शक्यताही काही भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








