कोल्हापूर, 20 ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संपूर्ण दिवस उलटूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृत निकाल जाहीर केलेला नाही. सद्यस्थितीत समविचारी पॅनेलने १३, तर महायुतीने १२ जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र, महायुतीकडून वारंवार फेरमतमोजणीची मागणी केली जात असल्याने विरोधकांनी संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवला आहे.
आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वर्चस्वाला धक्का दिल्याचे या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी महायुतीकडून फेरमतमोजणीसाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली असून, महायुतीचा हा ‘रडीचा डाव’ असल्याचे म्हटले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना वारंवार फोन येत असून त्यांच्यावर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने होत नसल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला. “अधिकारी वारंवार फोन उचलत आहेत. घरातून जेवणासाठी किंवा चहासाठी तर त्यांना फोन येत नसतील, यावरून मतमोजणी दबावाखाली सुरू असल्याचे स्पष्ट होते,” असा टोला त्यांनी लगावला. मतदान पत्रिकेवर (बॅलेट पेपर) मतदान झाल्यामुळेच हा निकाल फिरला असून, ईव्हीएम असते तर इकडे येण्याची गरजच पडली नसती, असे सांगत सत्ताधाऱ्यांनी जनतेचा कौल स्वीकारावा आणि सत्ता कायम नसते याचे भान ठेवावे, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही ट्वीट करत मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बॅलेट पेपरवरील निवडणुकीचा कौल स्पष्ट असताना आता सत्तेचा गैरवापर सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता, फेरमतमोजणीच्या माध्यमातून अपेक्षित निकाल फिरवण्यासाठी सूत्रे हलवली जात असल्याचा दावा पवार यांनी केला आहे.
निकाल चोरण्याचा प्रयत्न झाल्यास प्रामाणिक सभासदांशी गाठ असल्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. जर असा प्रकार घडला तर नेते आणि त्यांच्या पिलावळींना घराबाहेरही पडू देणार नाही, असा संतप्त इशारा त्यांनी आपल्या ट्वीटमधून दिला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुकन्या समृद्धी योजना: मुलगी १८ वर्षांची झाल्यावर खात्यातील संपूर्ण पैसे काढता येतात का? जाणून घ्या नियम
- Dussehra 2026 : दसऱ्याला आपट्याची पानं ‘सोनं’ म्हणून का वाटतात? जाणून घ्या परंपरेमागची रंजक कथा
- बदलणाऱ्या ऋतूत ओठांची काळजी कशी घ्यावी? भेगा आणि कोरडेपणा टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
Quick Answers
गोकुळ दूध संघाच्या २५ जागांसाठी निवडणूक झाली आहे. सद्यस्थितीत समविचारी पॅनेलने १३, तर महायुतीने १२ जागांवर आघाडी घेतली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांना वारंवार फोन येत असून त्यांच्यावर दबाव असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच महायुतीची फेरमतमोजणीची मागणी हा 'रडीचा डाव' असून ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून निकाल फिरवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. तसेच निकाल चोरण्याचा प्रयत्न झाल्यास नेते आणि त्यांच्या पिलावळींना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






