प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: हिंदी सिनेमातील काही गाणी अनेक वर्षांनंतरही म्युझिक लव्हर्सच्या जिभेवर रेंगाळत असतात. इंडस्ट्रीचा ‘बादशाह’ आणि ‘किंग खान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचे असेच एक कल्ट गाणे आजही लोकप्रिय आहे. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शक्ती: द पॉवर’ या चित्रपटातील हे गाणे तब्बल २४ वर्षांनंतरही एक ‘पार्टी एंथम’ बनले असून आजही गुणगुणले जाते.
या गाण्याचे बोल ‘कर दे मुश्किल जीना, इश्क कमीना’ असे आहेत. या गाण्यात शाहरुख खानने ‘बिहारी बाबू’ची भूमिका साकारत एक हाय एनर्जी स्पेशल अपिरियन्स दिला होता. यासोबतच अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनेही चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका करत शाहरुखसोबत या गाण्यावर डान्स परफॉर्मेन्स दिला होता. प्रदर्शित झालेल्या त्या काळात हे गाणे चार्टबस्टर ठरले होते.
या लोकप्रिय गाण्याला प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी आपला आवाज दिला आहे. या गाण्याचे गीत समीर अंजान यांनी लिहिले होते, तर अनु मलिक यांनी याला संगीत दिले होते.
‘शक्ती: द पॉवर’ हा २००२ सालचा एक ॲक्शन चित्रपट असून अभिनेत्री श्रीदेवी यांनी त्याची निर्मिती केली होती. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन कृष्णा वम्सी यांनी केले आहे. या चित्रपटात करिश्मा कपूर, नाना पाटेकर आणि संजय कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला नाही आणि थिएटरमध्ये आपटला. मात्र, चित्रपट अपयशी ठरूनही यातील शाहरुख खानचे हे गाणे प्रचंड गाजले.
📌 महत्वाच्या बातम्या
- मयंक यादवची ताशी १५० च्या वेगाने खतरनाक बॉलिंग, जमिनीसकट उखडले स्टम्प; पॉवरप्लेमध्येच वेस्ट इंडिजला फोडला घाम
- ‘सुशांतसारखाच मलाही त्रास दिला…’, नाना पाटेकरांनंतर आता तनुश्री दत्ताचा आणखी एक मोठा गौप्यस्फोट
- ‘मैं ज़िंदगी का साथ…’, नानांच्या आठवणीत बिग बी भावूक, शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









