प्रतिनिधी, 9 ऑक्टोबर: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्राच्या उर्वरित सर्व भागांतून पूर्णपणे माघार घेतली आहे. राज्यातून मान्सून परतला असला तरी, येत्या काही दिवसांत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये, विशेषतः तमिळनाडू आणि केरळमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
महाराष्ट्राव्यतिरिक्त मान्सूनने गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा राज्यांच्या काही भागांतून तसेच झारखंड व छत्तीसगडच्या आणखी काही भागांतूनही माघार घेतली आहे. सध्या मान्सूनच्या माघारीची रेषा सुपौल, रांची, सुंदरगड, हैदराबाद, बेळगावी आणि पणजी या भागांतून जात आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पूर्व भारत आणि ईशान्य भारतासह उत्तर द्वीपकल्पाच्या आणखी काही भागांतून मान्सून पूर्णपणे माघारी जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
उत्तर भारत आणि डोंगराळ प्रदेशांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच दिल्ली, पाटणा आणि लखनौमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे. ‘स्कायमेट’च्या दाव्यानुसार, पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत असून तेथून वारे खाली सरकत आहेत.
राज्यात १० ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची प्रक्रिया पूर्ण होणार असून हवामान कोरडे राहील. सध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता नसून केवळ तुरळक पावसाचा अंदाज आहे. तसेच तापमानात वाढ होण्याचे संकेत ‘स्कायमेट’ने दिले आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या उष्ण आणि दमट वाऱ्यांमुळे काही ठिकाणी तुरळक पाऊस होऊ शकतो, मात्र यामुळे उष्णता आणि दुष्काळाच्या झळा वाढण्याची भीती आहे. त्यातच अल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ३३ वर्षांपूर्वी ‘खलनायक’साठी नाना पाटेकर होते पहिली पसंती; संजय दत्तची कशी लागली वर्णी?
- दिवसातून काही क्षण मनमोकळेपणाने हसा, शारीरिक आणि मानसिक आरोग्याला मिळतील अनेक फायदे
- नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले, नानाचा मुलगा मल्हार यांचे वक्तव्य…
Quick Answers
नैऋत्य मान्सूनने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्राच्या उर्वरित सर्व भागांतून पूर्णपणे माघार घेतली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये, विशेषतः तमिळनाडू आणि केरळमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राव्यतिरिक्त मान्सूनने गोवा, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडच्या काही भागांतून माघार घेतली आहे.
महाराष्ट्रात १० ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची प्रक्रिया पूर्ण होऊन हवामान कोरडे राहील आणि मुसळधार पावसाची शक्यता नसून केवळ तुरळक पावसाचा अंदाज आहे. तसेच तापमानात वाढ होण्याचे संकेत ‘स्कायमेट’ने दिले आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









