Share

‘जेव्हा रोहित खेळतो, तेव्हा माझी नजर त्याच्या पत्नीला शोधते…’; अमिताभ बच्चन यांनी सांगितला रितिकाचा रंजक किस्सा

‘कौन बनेगा करोडपती १८’ मध्ये अमिताभ बच्चन यांनी रोहित शर्माची पत्नी रितिका हिच्या ‘फिंगर्स क्रॉस’ करण्याच्या सवयीबद्दल एक रंजक किस्सा सांगितला.

Published On: 

Amitabh Bachchan On Rohit Sharma Wife Ritika

प्रतिनिधी, 30 सप्टेंबर: ‘कौन बनेगा करोडपती १८’ या शोमध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्याची पत्नी रितिका सजदेह यांच्याबद्दल एक रंजक किस्सा शेअर केला आहे. सामन्यादरम्यान रोहित फलंदाजी करत असताना आपली नजर त्याच्या पत्नीला शोधत असते, असे बिग बींनी सांगितले.

या क्विझ शोमध्ये सोनाली नावाची एक स्पर्धक सहभागी झाली होती. तिने आपण रोहित शर्माची खूप मोठी चाहती असून त्याला भेटणे हे आपले एक स्वप्न असल्याचे सांगितले. तसेच, गमतीने तिने स्वतःला रोहितची पत्नी मानत असल्याचे म्हटले. यावर अमिताभ बच्चन यांनी मिश्किलपणे प्रतिक्रिया देत, सोनालीच्या मनातील हे प्रेम आपण नक्कीच रोहितपर्यंत पोहोचवू असे सांगितले.

Amitabh Bachchan On Rohit Sharma Wife Ritika

सोनालीच्या या बोलण्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही रोहित शर्मा आपला अत्यंत आवडता खेळाडू असल्याचे कबूल केले. त्यांनी अनेकदा रोहितशी वैयक्तिकरित्या संवाद साधला आहे. जेव्हा जेव्हा रोहित मैदानावर खेळतो, तेव्हा ते त्याचे सामने आवर्जून पाहतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रोहित खेळत असताना अमिताभ बच्चन यांचे लक्ष स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या रितिकाकडेही असते. रितिका नेहमीच ‘फिंगर्स क्रॉस’ करून बसलेली असते. या सवयीबद्दल कुतूहल वाटल्याने त्यांनी एकदा रोहितला याविषयी विचारले होते. त्यावर, रितिका लग्नापूर्वीही असेच करायची, असे रोहितने त्यांना सांगितले. ही अतिशय सुंदर आणि मनाला भावणारी गोष्ट असल्याचे अमिताभ यांनी नमूद केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

अमिताभ बच्चन यांनी रोहित शर्माची फलंदाजी पाहताना त्याची पत्नी रितिका सजदेह हिच्या 'फिंगर्स क्रॉस' करून बसण्याच्या सवयीबद्दल एक रंजक किस्सा सांगितला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही