कायम आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam Pandey Controversy) आता एक असा दावा केलाय, ज्यामुळे संपूर्ण इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली आहे. भारतात वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता दिली पाहिजे, अशी अत्यंत वादग्रस्त मागणी तिने केली असून, यामागे तिने दिलेला युक्तिवाद ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
RVCJ मुव्हीजला दिलेल्या एका मुलाखतीत पूनमने अडल्ट कंटेंट आणि पुरुषांची मानसिकता यावर भाष्य केलं. तिने चक्क स्वतःच्या बोल्ड आणि अडल्ट व्हिडिओंना ‘सोशल सर्व्हिस’ म्हणजेच समाजसेवा असल्याचं म्हटलं आहे. तिच्या मते, आजकाल अनेक पुरुष प्रचंड मानसिक तणावाखाली आणि फ्रस्ट्रेशनमध्ये असतात. अशा वेळी हे व्हिडिओ त्यांचा ताण कमी करण्यासाठी मदत करतात, असा अजब दावा तिने केलाय.
Poonam Pandey Controversy
त्यामुळेच, देशात सध्या वाढत चाललेला गुन्हेगारीचा आलेख खाली आणायचा असेल, तर वेश्याव्यवसायाला अधिकृत परवानगी देणं गरजेचं असल्याचं मत तिने मांडलं. पुरुषांना कोणत्या मानसिक संघर्षातून जावं लागतं, हे बऱ्याच जणांना समजत नाही. त्यामुळेच केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात अडल्ट व्हिडिओ ही एक अत्यंत महत्त्वाची समाजसेवा असल्याचं पूनमचं म्हणणं आहे.
दुसरीकडे, तिच्या या बिनधास्त वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. विशेष म्हणजे, सिनेसृष्टीतील तिचे स्वतःचे मित्रही तिची खिल्ली उडवतात, याची कबुली तिने दिली. तरीही या टीकेला सडेतोड उत्तर देताना ती म्हणाली की, लोकांच्या वाईट कमेंट्स वाचून मलाही राग येतो. पण केवळ अशा लोकांमुळे मी स्वतःचा स्टँडर्ड खाली आणणार नाही. थोडक्यात सांगायचं तर, पूनम पांडे आपल्या या अजब दाव्यावर ठाम असली, तरी नेटकऱ्यांनी मात्र तिच्या या विधानाचा तीव्र निषेध केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महिला आशिया कपमध्ये टीम इंडियाचा दणका, पाकिस्तानला सर्वात नीचांकी धावसंख्येवर रोखलं!
- ‘एकनाथ शिंदेंनी पाप केलंय, त्यांना मराठ्यांचा तळतळाट लागेल’; मनोज जरांगे पाटलांची टीका
- ‘मी एकनाथ शिंदेंना खूप मानते…’; गौतमी पाटीलचा जलवा, तर दुसरीकडे शिंदेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











