बुलढाणा : सध्या संपूर्ण राज्यात डीजेच्या (DJ) वापराबाबत वाद निर्माण झाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले असून, त्यात डीजेचा वापर आणि आवाजाची मर्यादा यांसारख्या बाबींचा समावेश आहे. यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. बुलढाण्यातील (Buldhana) भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांच्या एका विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवाच्या तोंडावर सुरु झालेल्या या आवाजी वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार श्वेता महाले यांनी सवाल उपस्थित केला आहे. “काही भोंगे दररोज त्रास देतात, मग गणेशोत्सवातच डीजेवर बंदी का? असा सवाल भाजपा नेत्या श्वेता महाले यांनी केला आहे. त्यांच्या या सवालावरून नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.
Shweta Mahale on DJ ban
बुलढाणा येथे झालेल्या जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीतही याचे पडसाद उमटले. लग्नसमारंभ, खाजगी कार्यक्रम आणि अगदी राजकीय कार्यक्रमांमध्येही डीजेचा वापर केला जातो. केवळ गणेशोत्सवाच्या काळातच डीजेवर निर्बंध घालण्याबाबत का चर्चा केली जाते, असा प्रश्न महाले यांनी उपस्थित केला.
डीजेचा त्रास होत असेल तर त्यावर सरसकट बंदी घातली पाहिजे, केवळ गणेशोत्सवासाठीच हे नियम का लागू असावेत, अशी स्पष्ट भूमिका महाले यांनी मांडली. जर डीजेवर बंदी घालायची असेलच तर ती सरसकट घाला, अशी मागणी महाले यांनी शांतता समितीच्या बैठकीत केली.
दरम्यान, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी सुरू केलेल्या ‘डीजे-मुक्त’ मोहिमेमुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावरून नागपूर पोलीस आयुक्तांनी थेट डीजेवर बंदी घातली आहे. यावरून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावर परस्परविरोधी मते व्यक्त केली आहेत. परिणामी, डीजे वाजवला जात नसतानाही संपूर्ण राज्यात वातावरण तापले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विराट कोहली वनडे क्रिकेटचे किंग; ग्लेन मॅक्सवेलने केलं कौतुक
- ‘मराठ्यांवर का जळता? महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल
- देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यातच डीजे बंदीचा फज्जा! नागपुरात लेझरच्या झगमगाटात दहीहंडी, पोलिसांसमोरच नियमांचे धिंडवडे












