Share

अभिषेक शर्माला युवराज सिंगची भन्नाट ‘शिक्षा’; वाढदिवशी कॅमेऱ्यासमोर काढल्या उठाबशा, व्हिडीओ चर्चेत

अभिषेक शर्माच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंगने मजेशीर व्हिडीओ शेअर करत त्याला उठाबशा काढायला लावल्या आहेत. सोबतच संयमाने खेळण्याची चार वचनंही घेतली आहेत.

Published On: 

Yuvraj Singh funny video with Abhishek Sharma on his birthday

भारतीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांची धुलाई करणारा अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आज चांगलाच चर्चेत आलाय. निमित्त आहे त्याच्या वाढदिवसाचं. पण, वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (Yuvraj Singh) त्याला अशी काही शिक्षा दिलीय, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

युवराज सिंगने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक अतिशय मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये टीम इंडियाचा हा धडाकेबाज फलंदाज चक्क कॅमेऱ्यासमोर आपले कान पकडून उठाबशा काढताना दिसतोय. युवराज केवळ अभिषेकला शिक्षाच देत नाहीये, तर त्याच्याकडून भविष्यातील क्रिकेटसाठी चार मोठी वचनंही घेताना दिसतोय.

Abhishek Sharma Birthday Yuvraj Singh Video

या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिषेक उठाबशा काढत आपल्या गुरुला चार गोष्टींचा शब्द देतोय. पहिलं वचन म्हणजे, तो पहिल्याच चेंडूवर कधीही षटकार मारणार नाही. दुसरं, फलंदाजीला आल्यावर खेळपट्टीवर टिकण्यासाठी पुरेसा वेळ घेईल. तिसरं, विचारपूर्वक धावा काढेल. आणि चौथं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे, पहिल्याच उसळी घेणाऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा मोह टाळेल.

मुळात अभिषेकची खेळायची स्टाईल खूप आक्रमक आहे. त्यामुळेच युवराजने त्याच्या भल्यासाठी आणि संयमाने खेळण्यासाठी त्याला या मजेशीर पद्धतीने कानमंत्र दिलाय. पंजाबच्या अमृतसरमधून आलेल्या या युवा खेळाडूला खऱ्या अर्थाने घडवण्यात युवराजचा मोठा वाटा राहिलाय. दोघेही डावखुरे असल्यामुळे अभिषेकची क्षमता युवराजने अगदी अचूक हेरलीय.

सध्या टीम इंडियाचा तो एक महत्त्वाचा सलामीवीर बनलाय. टी-२० फॉरमॅटमध्ये ५६ सामन्यांच्या ५५ डावांमध्ये १६२९ धावा आणि १८७.२५ चा भन्नाट स्ट्राईक रेट ही त्याची खरी ताकद आहे. सोबतच आयपीएलमध्येही त्याने ९२ सामन्यांत २३७८ धावा कुटल्या आहेत. त्यामुळेच अभिषेकने आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी मजल मारावी, यासाठी युवराज सातत्याने त्याला मार्गदर्शन करत असल्याचं या व्हिडीओतून पुन्हा एकदा समोर आलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही