Share

‘दुःखाची खोली माझ्याइतकी कुणाला कळणार?’; सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना सवाल

अजित पवारांच्या विमान अपघातावरून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Published On: 

Supriya Sule-Sunetra Pawar on Ajit Pawar

अजित दादांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलेल्या विधानाची सध्या चर्चा होत आहे. माझ्या भावाच्या विमानाचा एवढा मोठा अपघात झाला. सत्तेत असणाऱ्या, उपमुख्यमंत्री असणाऱ्या भावाचा अपघात झाला.

याबाबत अद्याप सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. तसेच, राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत आहे. अजित पवार गटातील ४० आमदार आणि ९ मंत्र्यांनी एफआयआर (FIR) किंवा चौकशीबाबत आजवर एकही शब्द काढलेला नाही. याबद्दल सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली.

Supriya Sule-Sunetra Pawar on Ajit Pawar

अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विधानांमुळे पवार कुटुंबात वाद निर्माण झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी माझ्या भावाचा विमान अपघातात मृ्त्यू झाला. या प्रकरणात अद्याप सरकारने कोणताही गुन्हा दाखल केलेला आहे. अजितदादा पवार यांच्या गटाच्या ४० आमदारांनी आणि ९ मंत्र्यांनी कधीही एफआयआर आणि चौकशीवर शब्दही काढलेला नाही. असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. “अजित दादांच्या जाण्याचे दुःख किती आहे हे माझी मुले आणि माझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असणार? अजित दादांच्या अपघाताचे राजकारण करू नका, अशी टीका सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर केली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “अजित दादांच्या अपघातामुळे झालेल्या वेदनेची खोली माझ्या मुलांइतकी आणि माझ्याइतकी इतर कोणाला समजणार?” त्यांनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर टीका करत, या घटनेचे राजकारण न करण्याचे आवाहनही केले.

“आमचा तपास यंत्रणांवर विश्वास आहे. त्यांना ही आपण वेळ दिला पाहिजे. दादांची आई… दादांची मुले आणि मी यांच्यापेक्षा जास्त दुःख कुणाला कळणार? दादांच्या जाण्याचे राजकारण कुणीच करू नये, असे मला वाटते. यामध्ये वारंवार मीडिया ट्रायल होत आहे का असे मला वाटते. सतत मीडियामध्ये म्हणजेच अपडेट मिळणे असे नाही,” असेही सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही