Share

‘बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मनमानी सुरू झाली’; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंनी ‘बाळासाहेबांनंतर शिवसेनेत मनमानी सुरू झाली’ असा गंभीर आरोप केला.

Published On: 

Eknath Shinde on Shivsena case

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सध्या शिवसेना (Shivsena) पक्ष आणि संबंधित पक्षचिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. आज शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर, प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची बाब उघड केली. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षात निवडणुका झाल्या नाहीत आणि मनमानी सुरू होती, असा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व राज्यस्तरीय प्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर, आज झालेल्या सुनावणीबाबत पत्रकारांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला.

Eknath Shinde on Shivsena case

शिंदे म्हणाले की, “शिवसेनेची बाजू मांडण्यास सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांची घटना, बाळासाहेबांचे विचार नंतर कसे पायदळी तुडवले हे संपूर्ण राज्याने पाहिलेले आहे. त्यामुळे त्यांची घटनाही बदलली, त्यांचे विचारही बदलले, सगळंच बदलले, त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले. हिंदुत्वही गोठवले.”

“आता धनुष्यबाणही गोठवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने जो काही निर्णय घेतला तो आपल्याला माहिती आहे. जनता आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी आहे. त्यांनी आम्हाला स्वीकारले आहे, त्यांनी आशीर्वादही दिले आहेत.” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, “आम्ही शिवसेनेत आहोत आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला आहे. न्यायप्रविष्ठ प्रश्नावर जास्त बोलणार नाही. बाळासाहेबांच्या नंतर मनमानी होवू लागली होती. बाळासाहेबांची शिवसेना विचारधारेपासून दूर होवू शकतं नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारे आहोत.”

“जे संविधान धोक्यात आहे, असे गळा काढत आहेत, त्यांनी स्वतःच्या पक्षात आत्मपरिक्षण केले पाहिजे. बाळासाहेबांनी लोकशाही घडवली, ती लोकशाही बुडवण्याचे काम यांनी केले. हम करे सो कायदा असे त्यांनी केलेले आहे. म्हणून आज ही परिस्थिती आहे,” असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, शिवसेनेकडून आता पुढील सुनावणीत नेमका काय युक्तिवाद केला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही